मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.
निरोपपर गीत
जाहलें भजन आम्ही नमितों तव चरणां ।।
वारुनियां विघ्नें देवा रक्षावें दीनां ।। धृ० ।।
दास तुझे आम्ही देवा तुलाचि ध्यातों ।।
प्रेमेंकरूनी देवा गुण तुझे गीतो ।। १ ।।
तरी न्यावी सिद्धि देवा हेचि वासना ।।
रक्षुनीयां सर्वां द्यावी आम्हांसी आज्ञा ।। २ ।।
मागणें तें देवा आतां एकचि आहे ।
तारूनियां सकळां आम्हां कृपादृष्टी पाहें ।। ३ ।।
जेव्हां आम्ही मिळू ऐशा या ठाया ।।
प्रेमानंदे लागू तुझी कीर्ती गावया ।। ४ ।।
सदा ऐसी भक्ती राहो आमुच्या मनीं ।।
हेचि देवा तुम्हां असे नित्य विनवणी ।। ५ ।।
वारुनिया संकटे आतां आमुचीं सारीं ।।
कृपेची साउली देवा दीनांवरी करीं ।। ६ ।।
निरंतर आमुची चिंता तुम्हां असावीं ।।
आम्हां सर्वांची लज्जा देवा तुम्हीं रक्षावी ।। ७ ।।
निरोप घे आम्हा आज्ञा असावी।
चुकलें आमचें काही त्याची क्षमा असावी ।। जाहलें ।।