मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.
आरती श्रीनवनाथांची
जयदेव जयदेव जय श्रीनवनाथा ।
भक्तगण उद्धरी देऊन सिद्ध करा ।। धृ० ।।
मच्छिंद्र गोरख तैसे जालिंदरनाथ।
कानिफ गहिनीनाथ नागेशसहित ।
चर्पटि भर्तरी रेवण मिळुनी नवनाथ।
नवनारायण अवतार संत ।। जय० ।। १ ।।
भक्तिशक्ती बोधावैराग्यहित ।
तापत्रय ते हरिती स्मएकचित्त ।
नमने चरित्र पठणें दुरितांचा अंत ।
भक्तजनासी तारी नवनाथ खचित ।। जय० ।। २ ।।
इहपर साधुनि देति समस्त नवनाथ।
भूत समंधा प्रेता घालविती सत्य।
भक्तजनांचे पुरवा तुम्हीच संकल्प ।
कृपार्थ होता दावा सदानंदरूप ।। जय० ।। ३ ।।
दुःखी दीन दरिद्री लोकांना तारा।
देऊनि सुख संपत्ति मुक्ती दोहि करा।
स्मरण करावे आता नित्य नित्यनाथा ।
शरणागत मी तुमच्या पायी मम माथा । जय० ।। ४ ।।
नवनाथाचि आधार सकलांना आता ।
आरती ओवाळिता हरली भवचिंता ।
ब्रह्म सनातन शांति देई मम चित्ता।
शरण विनायक लोटांगण आता ।। जय० ।। ५ ।।