मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    सर्व एकादशी बद्दल माहिती

    भागवत एकादशी; या एकादशी व्रताचे महत्त्व आणि पूजा विधी जाणून घ्या-Bhagwat Ekadashi

    Bhagwat Ekadashi : पंचांगानुसार, 6 मार्च रोजी स्मार्त विजया एकादशी झाली आणि आता 7 मार्च रोजी भागवत एकादशी आहे. या दोन्ही एकादशींमध्ये फरक काय? त्याच प्रमाणे भागवत एकादशीचे महत्त्व नेमके काय? जाणून घ्या

    Bhagwat Ekadashi 2024 :प्रत्येक चंद्रमासातील शुक्ल आणि कृष्ण पक्षातील 11 व्या तिथीलाएकादशी (Ekadashi)म्हणतात. भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी भागवत एकादशीचं व्रत केलं जातं. या दिवशी उपवास करतात, विष्णू देवाची पूजा करतात. एकादशीला ठेवलेला उपवास दुसर्‍या दिवशी उपवास सोडला जातो. प्रामुख्याने वारकरी संप्रादयामध्ये एकादशीचं व्रत अगदी भक्तीभावाने पाळलं जातं. यंदा गुरुवार, 7 मार्च 2024 रोजी भागवत एकादशी आहे.

    यंदा कृष्ण पक्षात एकादशीचे दोन भेद आले आहेत - स्मार्त एकादशी आणि भागवत एकादशी. ज्या पक्षात एकादशीचे दोन भेद येतात, त्यात पहिल्या दिवशी स्मार्त एकादशी आणि दुसऱ्या दिवशी भागवत एकादशी असते. यंदा हा योग जुळून आला आहे. यातील पहिल्या येणाऱ्या स्मार्त एकादशीला नाव असतं, पण भागवत एकादशीला नाव नसतं.

    वारकरी सांप्रदायात भागवत एकादशीला विशेष महत्त्व

    वारकरी सांप्रदाय भागवत एकादशी नियमाने साजरी करतो. विष्णू देवाचे भक्त पण भागवत एकादशीच्या दिवशी उपवास ठेव शकतात. या एकादशीच्या दिवशी भगवान विष्णुंची पूजा करून बहुतेक विष्णू भक्त दिवसभर उपवास करतात. भागवत एकादशी व्रत हे पूर्ण नियम आणि श्रद्धेने केलं जातं. या व्रताच्या प्रभावामुळे मोक्ष प्राप्ती होते, असं म्हणतात. भागवत एकादशीला केलेल्या व्रतामुळे अश्वमेध यज्ञ, घोर तपस्या, तीर्थ स्नान आणि दान या सर्वांपासून मिळणाऱ्या पुण्यापेक्षाही जास्त पुण्य मिळते, असं म्हणतात.

    भागवत एकादशी पूजाविधी (Bhagwat Ekadashi Puja Vidhi)

    भागवत एकादशीच्या दिवशी पहाटे उठून अंघोळ करुन चांगले कपडे परिधान करा. नंतर पूजा करण्यासाठी एक चौरंग तयार करा. चौरंगावर पिवळ्या रंगाच्या वस्त्रावर विष्णू देवाची मूर्ती किंवा फोटो ठेवा. विष्णू देवाची फळं-फुलं, नारळ, पान-सुपारीने पूजा करा. पूजेनंतर विष्णू देवाची आरती करा. विष्णू देवाला नैवेद्य अर्पण करा.

    एकादशी व्रताचे महत्त्व (Ekadashi Vrat Significance)

    एकादशी व्रत केल्यास भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. यासोबतच घरात सुख-समृद्धी नांदते. एकादशीच्या दिवशी विष्णूंची पूजा केल्याने अधिक फलप्राप्ती होते. भक्तांवर श्रीहरी-विष्णूंची कृपा कायम राहते. लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि धन-संपत्तीत वाढ होते.

    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा
    Loading...