मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.
संत एकनाथांचे साहित्य
एकनाथाची आरती
आरती एकनाथा ।।
महाराजा समर्था ।।
त्रिभुवनीं तूंचि थोर ।।
जगद्गुरु जगन्नाथा ।। धृ० ।।
एकनाथ नाम सार ।।
वेद शास्त्रांचे गूज ।।
संसारदुःख नासे ।।
महामंत्रांचे बीज ।। आरती० ।। १ ।।
एकनाथ नाम घेतां ।।
सुख वाटले चित्ता ।।
अनंत गोपाळादास ।।
धरणी न पुरे गातां ।। आरती० ।। २ ।।
Loading...