मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.
संत तुकारामांचे साहित्य
तुकारामाची आरती
स्वामी सद्गुरुधामा ।।
आरती तुकारामा ।।
सच्चिदानंदमूर्ती ।।
पाय दाखवीं आम्हां ।। धृ० ।।
राघवें सागरांत ।।
पाषाण तारीले ।।
तैसे हे तुकोबाचे ।।
अभंग उदकीं रक्षिले ।। आरती० ।। १ ।।
तुकीतां तुलनेसी ।।
ब्रह्म तुकासी आलें ।।
म्हणोनी रामेश्वरें ।।
चरणीं मस्तक ठेविलें ।। आरती० ।। २ ।।
संत तुकारामांचे साहित्य
Loading...