मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    संत रोहिदासांचे साहित्य

    रोहिदासांचे दोहे

    'रविदास' हमारो रामजी, दसरथ करि सुत नांहि।

    राम हमउ मंहि रमि रह्यो, बिसब कुटंबह मांहि ॥ १॥


    संत रोहिदास म्हणतात की, "आम्ही ज्याची आराधना करतो, तो आमचा राम दशरथ राजाचा पुत्र नव्हे. तो राम तर सर्वव्यापक आहे. तो राम आमच्या हृदयात आहे. तसेच तो विश्वरूपी परिवारात सामावलेला आहे."



    'रविदास' हमारो राम तो, सकल रह्यो भरपूरि ।

    रोम रोम मंहि रमि रह्यो, राम मसूक न दूरि॥ २॥
    संत रोहिदास म्हणतात की, "आमचा राम तर सर्व ब्रह्मांडात व्यापलेला आहे. तो तर कणाकणांत आणि रोमरोमात सामावलेला आहे. राम आपल्या प्रियतमा साधकापासून कधी दूर नसतो."



    सब बिआपक राम हई, नांह कोउ इक ठांव।

    सत्त गुरु साहिब सखा भयो, 'रविदास' हमारो राम ॥ ३॥

    संत रोहिदास म्हणतात की, 'राम तर सर्व व्यापक आहे. त्याचे राहाण्याचे कोणतेही एक स्थान नाही. सद्‌गुरुच्या कृपेने तो राम मला मिळाला आहे आणि तो माझा मित्र बनला आहे.



    सब्ब निवासी राम जू, सब घट रह्यो समाइ।

    'रविदास' नाम चकमक बिना, हक नूर अद्रिस्टाइ॥ ४॥
    संत रोहिदास म्हणतात की, "राम तर सर्व ठिकाणी राहतो. तो कणाकणामध्ये व्यापलेला आहे. परंतु जोपर्यंत रामनामरूपी चकमक दगडाबरोबर आपल्या हृदयास घर्षण केले जात नाही तोपर्यंत तो पाहू शकत नाही किंवा अनुभवही केला जाऊ शकत नाही."



    सब्ब घट मेरा सांइयां, जलवा रह्यो दिखाई।

    'रविदास' नगर मंहि रमि रह्यो, नेकहु न इत उत जाइ ॥ ५॥
    संत रोहिदास म्हणतात की, 'माझा मालक तो परमेश्वर प्रत्येकाच्या शरीरात आहे. तो तर माझ्या शरीररूपी नगरातसुद्धा राहात आहे. तो मला सोडून क्षणभरही कुठे इकडेतिकडे जात नाही. तो नेहमी माझ्यात रोहतो.



    सब घट मंहि रहम रह्यो, 'रविदास' हमारा राम।

    सोई बूझै राम को, जो होइ राम का दास॥ ६॥


    संत रविदास म्हणतात की, "आमचा राम तर सर्व प्राण्यात राहतो. जो त्याचा दास-सेवक बनतो, तोच त्या रामाला ओळखतो."



    घट घट बिआपक राम है। रामंहि बूझै कोय।

    'रविदास' बूझै सोइ राम कूं, जउ रामसनेही होय ॥ ७॥
    संत रोहिदास म्हणतात की, "राम तर सर्वव्यापक आहे. पंरतु त्या रामाची ओळख कोणाला तरी होते. जो त्यांचा मित्रप्रेमी होऊन राहातो, तोच त्या रामाला ओळखतो."



    'रविदास' हौ खालिक देखिआ, सकल रह्या भरपूर ।

    सब दिसि देखहुं बिआपिआ, खालिक का ही नूर ॥ ८ ॥
    संत रोहिदास म्हणतात की, "मी सृष्टिकर्त्यास पाहिलेले आहे. तो तर सर्व जगात व्यापलेला आहे. चारी बाजूस डोळे उघडून मी जेथे जेथे पाहातो, तेथे तेथे त्या सृष्टीकर्त्याचा प्रकाश सर्वत्र पसरलेला दिसून येतो."



    मुकुर मांह परछांइ ज्यों, पुहुप मधे ज्यों बास।

    तैसउ ही श्रीहरि बसै, हिरदै मधे 'रविदास' ॥ ९॥
    संत रोहिदास म्हणतात की, "ज्या प्रमाणे दर्पणात (आरशात) फोटो दिसतो, फुलात सुवास असतो, त्याप्रमाणे तो श्रीहरी (ब्रह्म) हृदय मंदिरात राहतो, जर त्यास प्राप्त करावयाचा असेल तर, त्याचा शोध आपल्यामध्येच केला पाहिजे."



    मुकुर मांह परछांइ ज्यों, पुहुप मधे ज्यों बास।

    तैसउ ही श्रीहरि बसै, हिरदै मधे 'रविदास' ॥ ९॥
    संत रोहिदास म्हणतात की, "ज्या प्रमाणे दर्पणात (आरशात) फोटो दिसतो, फुलात सुवास असतो, त्याप्रमाणे तो श्रीहरी (ब्रह्म) हृदय मंदिरात राहतो, जर त्यास प्राप्त करावयाचा असेल तर, त्याचा शोध आपल्यामध्येच केला पाहिजे."



    'रविदास' पीव इक सकल घट, बाहर भीतर सोइ।

    सब दिसि देखउं पीव पीव, दूसर नांहि कोइ ॥ १०॥
    संत रोहिदास म्हणतात की, "माझा तो एक प्रियकरच सर्व ठिकाणी व्यापलेला आहे. तो आपल्यात सुद्धा दिसत आहे. आणि बाहेरसुद्धा तो माझा प्रियकर मला दिसत आहे. मी जिकडे पाहातो, तिकडे त्या प्रियकरा (परमेश्वर) शिवाय मला काही दिसत नाही."



    एकै ब्रह्म हइ सकल मंहि, अरू सकल ब्रम्ह मांहि। '

    रविदास' ब्रह्म सब भेष मंहि, ब्रह्म बिना कछु नांहि ॥ ११॥

    संत रोहिदास म्हणतात की, "सर्व जगात फक्त एकच ब्रह्म पसरलेले आहे आणि हे सर्व जग त्या एका ब्रह्मात व्यापलेले आहे. जे काही ह्या जगात आहे, ते सर्व काही त्या ब्रह्माचेच रूप आहे. त्या एका ब्रह्माशिवाय येथे काहीसुद्धा नाही."



    गगन मंडल पिअ रूप सों, कोट भान उजियार।

    'रविदास' मगन मनुआ भया, पिआ निहार निहार ॥ १२॥

    संत रोहिदास म्हणतात की, "माझ्या प्रियतमाच्या दिव्य रूपाच्या अपार छटाने सर्व गगन मडंळ (माझे हृदयरुपी आकाश) एवढे प्रकाशित झाले आहे की, जणू काय कोटि कोटि सूर्य उगवले आहेत. माझे हृदय आपल्या प्रियकराच्या अनुपम रूपास पाहून मग्न होत आहे."



    'रविदास' पिअ बिनु जगत मंह, सुनी सेज न कोइ।

    जित देखूं तित पिअ कर, प्रगट मोजरा होइ ॥ १३॥
    संत रोहिदास म्हणतात की, "
    जेथे माझ्या प्रियकर परमेश्वराची शय्या (सेज) नाही, माझ्या स्वामीच्या विश्रांतीची जागा नाही. असे ह्या जगात (अखिल ब्रह्मांडात) कोणतेही ठिकाण नाही. मी तर जेथे पाहातो. तेथे मला आपल्या प्रियकराचे स्पष्ट दर्शन होते. माझा स्वामी (मालक) मला सर्व ठिकाणी दिसत आहे."



    गनी गरीब नवाज प्रभ, दीनन के रखवार ॥ १५॥


    संत रोहिदास म्हणतात की, "ह्या जगात रामासारखा दुसरा कोणी उदार नाही. तो मोठा दयाळू धनी आहे. तो गरीबांचा पालन करणारा आहे आणि गरीब दुःखी लोकांचा रक्षक आहे."



    काबे अरू कैलास मंह, जिह कूं, ढूंढण जांह।

    'रविदास' पिआरा राम तउ, बइठहिं मन मांह ॥ १॥
    संत रोहिदास म्हणतात की, "तुम्ही ज्याचा शोध काबा आणि कैलासमध्ये करीत आहांत, तो आवडता राम तर तुमच्या मन रूपी मंदिरातच आहे. त्याला प्राप्त करावयाचा असेल तर तुम्ही त्याचा आपल्यामध्येच शोध करा."



    बाहर खोजत का फिरइ, घट भीतर ही खोज।

    'रविदास' उनमनि साधिकर, देखहु पिआं कूं ओज ॥ २॥
    संत रोहिदास म्हणतात की, "तुम्ही बाहेर कुठें शोधत फिरत आहात? तुम्ही ज्याच्या शोधात आहांत, तो बाहेर कुठेही मिळणार नाही. तुम्हास त्याला प्राप्त करावयाचे असेल तर, तुम्ही त्यास आपल्या हृदय मंदिरातच शोधा. समाधी लावा. मनाला प्रापंचिक भोग्य पदार्थातून काढून अंतर्मुख करा, त्याच्या ध्यानात मग्न होऊन, त्याच्या स्मरणात स्वतःला विसरून जा. तसे केल्यास तुम्ही आपल्या हृदय मंदिरात त्याचा दिव्य प्रकाश पाहाल.



    वन खोजइ पिअ न मिलहि, बन मंह प्रीतम नांह।

    'रविदास' पिअ है बसि रह्यो, मानव प्रेमंहि मांह ॥ ३॥
    संत रोहिदास म्हणतात की, "वनात शोधल्याने प्रियकर मिळणार नाही. कारण तो वनात नाही. जेथे मानवतेसाठी प्रेम आहे. तेथे तो राहतो. मनुष्य प्राण्याबरोबर प्रेम करणे म्हणजेच त्याची भक्ती आहे. कारण नर- नारायण दोन्ही एकच आहेत. दोघात काही फरक नाही."



    वन खोजन का जाइ रे, राम तउ अलोपा नांह।
    सर्व बिआपी राम तौ, 'रविदास' सभन कै मांह ॥ ४॥

    संत रोहिदास म्हणतात की, "अरे रामाला शोधावयास वनात कां जाता? तो गुप्त तर झालेला नाही. आणि कोठे हरवलेला सुद्धा नाही. तो तर सर्वच ठिकाणी आहे. तो सर्वांमध्ये सामावलेला आहे. तुम्ही त्याला जेथे पाहू इच्छिता, तेथे तो तुम्ही पाहू शकाल. तसेच प्राप्त करू शकाल."



    राधों क्रिस्न करीम हरि, राम रहीम खुदाय।

    'रविदास' मोरे मन बसहिं, कहु खोजहूं बन जाय ॥ ५॥ 


    संत रोहिदास म्हणतात की, "तुम्ही त्यास राघव म्हणा अथवा कृष्ण, करीम म्हणा अथवा हरी, राम म्हणा अथवा रहीम. ते सर्व एक रूप आहेत. तो ईश्वर परमेश्वर. ज्याची अनेक नावे आहेत. तो माझ्या मनात नेहमीच बसलेला आहे. मी त्यास वनात शोधावयास कां जाऊ?


    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा
    Loading...