मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    सण व उत्सव

    मार्तंडभैरव षडरात्रोत्सव

    श्री खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत असून खंडोबाचे नवरात्र मार्गशीर्ष महिन्याच्या शुद्ध प्रतिपदा ते शुद्ध षष्ठी दरम्यान साजरे केले जाते, म्हणजेच सहा दिवस चालणारा हा सण आहे. मार्गशीर्ष महिना खंडोबाच्या भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

    मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवशी देवदीपावली साजरी केली जाते आणि त्यानंतर चंपाषष्ठीपर्यंत खंडोबा नवरात्र साजरा केला जातो. मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी म्हणजेच चंपाषष्ठीला या नवरात्राची सांगता होते.

    या नवरात्रात भाविक पाच दिवस उपवास ठेवतात आणि सहाव्या दिवशी उपवास सोडतात. खंडोबाच्या भक्तांच्या मनोकामनांची पूर्तता होण्यासाठी या दिवशी विशेष पूजा केली जाते.

    खरं तर चंपाषष्ठी हा षड्रोत्सव असतो, परंतु त्याला नवरात्र म्हणून साजरा केला जातो. यंदा मार्गशीर्ष मास 2 डिसेंबरपासून सुरू झाला आहे आणि 6 डिसेंबर 2024 रोजी नागदिवे पूजन होईल. 7 डिसेंबर 2024 रोजी चंपाषष्ठी साजरी केली जाईल.

    चंपाषष्ठीचा उत्सव मणी आणि मल्ल या दोन राक्षसांचा खंडोबाने वध करून लोकांना मुक्त केल्याच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. यामुळे खंडोबाच्या भक्तांनी या दिवशी विशेष पूजा करून त्याच्या कृपेची प्राप्ती केली जाते.
    ALSO READ:श्री खंडोबा महाराज तळी आरती

    जेजुरीला हा सण धणक्यात साजरा केला जातो. येथे पहिल्याच दिवसापासून पुढील 6 दिवस दिवे, नंदादीप लावले जातात. देवदीपावली हा खंडोबाच्या देवळामध्ये साजरा केला जाणार्‍या महत्त्वाच्या उत्सवापैकी एक आहे.
    श्री खंडोबा हा शंकराचा अवतार, चैत्री पौर्णिमाला या मार्तंड-भैरवाचा अवतार झाला. मल्हारी, मार्तण्डभैरव, खंडोबा, म्हाळसाकांत अशा विविध नावाने हा अवतार ओळखला जातो. मल्हारी-मार्तंड हा शिवाचा भैरव अवतार आहे. मणी-मल्ली नावाच्या राक्षसांचा संहार करण्यासाठी शंकराने हा मल्हारी अवतार धारण केला. मणी-मल्ली या राक्षसांबरोबर मार्गशीष महिन्याच्या पहिल्या दिवसापासून सलग सहा दिवस युद्ध चालले आणि षष्ठीला राक्षसांचा नायनाट करून विजय संपादन केला तो दिवस म्हणजे चंपाषष्ठी.

    ALSO READ: खंडोबाची पूजा करण्याची पद्धतALSO READ: मार्तंडभैरव षडरात्रोत्सव
    ALSO READ: 
    श्री खंडोबा महाराज तळी आरती
    ALSO READ:  खंडोबा भंडार मंत्र आणि भूपाळी
    ALSO READ:  चंपाषष्ठी कधी आहे? जाणून घ्या नागदिव्याचे, तळी उचलण्याचे महत्व आणि मान्यता
    ALSO READ: 
    मल्हारी मार्तंड खंडोबाची जेजुरी
    ALSO READ: श्रीखंडेरायाची आरती

    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा
    Loading...