मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    गुढीपाडवा

    Gudi Padwa 2025 : गुढीपाडवा साजरा करण्यामागे आहे 'या' अनेक कथा, सर्वांना माहित असायलाच हव्यात

    Why Gudi Padwa is Celebrated: 30 मार्च, 2025 रोजी साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जाणारा सण गुढीपाडवा साजरा केला जाईल. गुढीपाडवा हा सण का साजरा करतात? तर गुढीपाडव्याशी निगडीत आहेत 'या' पौराणिक कथा, चला जाणून घेऊया.
    भारतीय संस्कृतीत 'चैत्र शुद्ध प्रतिपदा' हा दिवस 'महापर्व' म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे. महापर्वाच्या अर्थात नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण 'गुढीपाडवा' (Gudi Padwa 2025) म्हणून साजरा करतो. या दिवशी विजयाचे प्रतिक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते. ही गुढी का उभारली जाते? गुढीपाडवा चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच का साजरा करतात? गुढी उभारण्यापूर्वी ब्रम्हदेवाची पूजा का केली जाते व गुढी उभारून झाल्यावर विष्णू देवाची पूजा करतात? सर्वकाही दडलंय या कथांमध्ये, तेव्हा या पौराणिक कथा सर्वांना माहित असायलाच हव्यात.

    शालिवाहन शकास सुरुवात
    शालिवाहन ह्या राजाने शालिवाहन शकास सुरुवात केली आणि या शकाची सुरुवात अर्थात आरंभ म्हणजेच गुढीपाडवा होय. शक सुरु करणारा पहिला महाराष्ट्रीयन राजा म्हणून आजही शालिवाहन राजाचे महत्त्व आहे. शालिवाहनाने मातीचे सैन्य तयार केले, त्यावर पाणी शिंपडून मातीच्या सैन्यात प्राण भरला. मग या सैन्यांच्या मदतीने त्याने प्रभावी शत्रूंचा पराभव केला, अशी आख्यायिका आहे. या विजयाप्रित्यर्थ शालिवाहन शके सुरु होऊन नवीन वर्षाची सुरुवात होते. या दिवशी पंचाग वाचन करून आणि देवी सरस्वतीचे पूजन करून हिंदू नववर्षाचे स्वागत करण्याची प्रथा आहे.



    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा
    Loading...