मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    ५२ अध्यायी गुरूचरित्र - Guru Charitra 52 Adhyay in Marathi

    गुरूचरित्र हे मराठीतील एक प्रभावशाली धार्मिक पुस्तक आहे. १५ व्या- १६ व्या शतकात श्री. सरस्वती गंगाधर स्वामींनी हे पुस्तक लिहीले. ह्या ग्रंथाला पवित्र वेद समजतात, म्हणून या ग्रंथाचे पारायण कठोर नियमाने करावे. याचे नियम या ग्रंथातच दिलेले आहेत. हा ग्रंथ सात दिवसांच्या सप्ताहातच किंवा तीन दिवसातच पूर्ण करावा असा नियम आहे. या पुस्तकात नृसिंहसरस्वती यांचे चरीत्र, त्यांचे तत्वज्ञान, आणि त्यांच्याबद्दलच्या पौराणिक कथा आहेत. या पुस्तकात उर्दु आणि पर्शियन शब्द टाळून संस्कृत शब्द वापरलेले आहेत. गुरुचरित्र हिंदू लोकांत फार पवित्र ग्रंथ मानतात. सर्व दत्त भक्त या ग्रंथाचे मार्गशीर्ष महिन्यात येणार्याय पौर्णिमेपासून आठ दिवस आधी पारायण करतात आणि पौर्णिमेच्या दिवशी, उद्यापन करतात. मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा दत्तजयंती होय.

    श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे?

    श्री गुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदांइतकाच मान्यता पावलाला अहे. इसवी सनाच्या १४व्या शतकात नृसिंहसरस्वती यांचा दिव्य व अदभूत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्रीगुरूंच्या शिष्य परंपरेतील श्रीसरस्वती गंगाधर यांनी १५व्या शतकात लिहीला.

    श्री गुरूंच्या चरित्रासारखा अलौकिक विषय व परंपरेचा वारसा लाभला श्रीगुरुकृपासंपन्न, सिद्धानुभवी लेखक, असा योग जुळून आल्यामुळे या समग्र ग्रंथास सिद्ध मंत्राचे सामर्थ्य प्राप्त झाले आहे. हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे. संकल्प-पूर्तीसाठी श्रीगुरुचरित्र-वाचनाची विशिष्ट पद्धती आहे. त्याप्रमाणेच वाचन, पारायण व्हावे असे स्वतः गुरुचरित्रकार म्हणतात.

    “अंतःकरण असता पवित्र । सदाकाळ वाचावे गुरुचरित्र ।”

    अंतर्बाह्य शुचिर्भूतता राखून ह्या ग्रंथाचे वाचन करावे वैविध्य पूर्ण अशा संकल्प पूर्तते साठी गुरुचरित्र सप्ताह वाचनाचे अनुष्ठान निश्चित फलदायी ठरते, असा अनेक वाचकांचा व साधकांचा अनुभव आहे. त्या दृष्टीने अनुष्ठानाच्या काळात पाळावयाचा सामान्य संकेत व नियम पुढीलप्रमाणे आहेत.

    पारायण काळात पाळावयाचा सामान्य संकेत व नियम

    • वाचन हे नेहमी एका लयीत, शांत व सुस्पष्ट असे असावे. उरकण्याच्या दृष्टीने ऊच्चारभ्रष्टता होऊ नये. चित्त अक्षरातून व्यक्त होणा-या अर्थाकडे असावे.
    • वाचनासाठी नेहमी पूर्वा भिमुख वा उत्तरा भिमुखच बसावे.
    • वाचनासाठी ठरविक वेळ, ठरविक दिशा व ठरविक जागाच असावी. कोणत्याही कारणास्तव ह्मात बदल होऊ देऊ नये.
    • श्रीदत्तात्रायांची मूर्ती वा प्रतिमा नसल्यास पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी व तीत श्रीदत्तात्रायांना अवाहन करावे.
    • सप्ताहकालात ब्र्म्ह्चर्याचे पालन व्हावे. वाचन शुचिर्भूत पणाने व सोवळ्या नेच करावे . सप्ताहात केवळ हविषान्न घ्यावे. हविषान्न म्हणजे दूधभात. (मीठ-तिखट, अंबट, दही, ताक वर्ज. साखर घ्यावी. गूळ घाउ नये. गव्हाची पोळी (चपाती), तूप,साखर घेता येते.)
    • रात्री देवाच्या सन्निधच चटईवर अथवा पांढ-या धाबळीवर झोपावे. झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे संकल्पपूर्तीचा दृष्टीने संदेश ऐकू यातात, असा श्रद्धेने अनुष्ठान करणा-यांचा अनुभव आहे.
    • वाचनाच्या काळात मध्येच असनावरून उठू नये किंवा दुस-याशी बोलू नये.
    • सप्ताहाचा प्रारंभ पुष्कळदा शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करतात. कारण शुक्रवार हा श्रीगुरूंच्या निजानंद गमनाचा दिवस होय.
    • सप्ताह पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी, शक्य तर अठव्या दिवशी, सुपारीतून श्रीदत्तात्रायांचे विसर्जन करावे, आणि नैवेद्य, आरती करून, भोजनास सवाष्ण, ब्राम्हण सांगून सांगता करावी. महा नैवाद्मात शक्यतो घेवड्याची भाजी असावी.

    ५२ अध्यायी गुरूचरित्र – अध्याय पहिला

    गुरूचरित्र अध्याय दुसरा - ॥ श्री गुरूचरित्र ॥ Shri GuruCharitra

    गुरूचरित्र अध्याय तिसरा - ॥ श्री गुरूचरित्र ॥ Shri GuruCharitra

    गुरूचरित्र अध्याय चौथा - दत्त जन्म - ॥ श्री गुरूचरित्र ॥ Shri GuruCharitra

    गुरूचरित्र अध्याय पाचवा - ॥ श्री गुरूचरित्र ॥ Shri GuruCharitra

    गुरूचरित्र अध्याय सहावा - ॥ श्री गुरूचरित्र ॥ Shri GuruCharitra

    गुरूचरित्र अध्याय सातवा - ॥ श्री गुरूचरित्र ॥ Shri GuruCharitra

    गुरूचरित्र अध्याय आठवा - ॥ श्री गुरूचरित्र ॥ Shri GuruCharitra

    गुरूचरित्र अध्याय नववा - ॥ श्री गुरूचरित्र ॥ Shri GuruCharitra

    गुरूचरित्र अध्याय दहावा - ॥ श्री गुरूचरित्र ॥ Shri GuruCharitra

    गुरूचरित्र अध्याय अकरावा - ॥ श्री गुरूचरित्र ॥ Shri GuruCharitra

    गुरूचरित्र अध्याय बारावा - ॥ श्री गुरूचरित्र ॥ Shri GuruCharitra

    गुरूचरित्र अध्याय तेरावा ॥ श्री गुरूचरित्र ॥ Shri GuruCharitra

    गुरूचरित्र अध्याय चौदावा ॥ श्री गुरूचरित्र ॥ Shri GuruCharitra

    गुरूचरित्र अध्याय पंधरावा ॥ श्री गुरूचरित्र ॥ Shri GuruCharitra

    गुरूचरित्र अध्याय सोळावा ॥ श्री गुरूचरित्र ॥ Shri GuruCharitra

    गुरूचरित्र अध्याय सतरावा ॥ श्री गुरूचरित्र ॥ Shri GuruCharitra

    गुरूचरित्र अध्याय अठरावा ॥ श्री गुरूचरित्र ॥ Shri GuruCharitra

    गुरूचरित्र अध्याय एकोणीसावा ॥ श्री गुरूचरित्र ॥ Shri GuruCharitra

    गुरूचरित्र अध्याय विसावा ॥ श्री गुरूचरित्र ॥ Shri GuruCharitra

    गुरूचरित्र अध्याय एकविसावा ॥ श्री गुरूचरित्र ॥ Shri GuruCharitra

    गुरूचरित्र अध्याय बाविसावा ॥ श्री गुरूचरित्र ॥ Shri GuruCharitra

    गुरूचरित्र अध्याय तेविसावा ॥ श्री गुरूचरित्र ॥ Shri GuruCharitra

    गुरूचरित्र अध्याय चोविसावा ॥ श्री गुरूचरित्र ॥ Shri GuruCharitra

    गुरूचरित्र अध्याय पंचविसावा ॥ श्री गुरूचरित्र ॥ Shri GuruCharitra

    गुरूचरित्र अध्याय सव्विसावा ॥ श्री गुरूचरित्र ॥ Shri GuruCharitra

    गुरूचरित्र अध्याय सत्ताविसावा ॥ श्री गुरूचरित्र ॥ Shri GuruCharitra

    गुरूचरित्र अध्याय अठ्ठाविसावा ॥ श्री गुरूचरित्र ॥ Shri GuruCharitra

    गुरूचरित्र अध्याय एकोणतिसावा ॥ श्री गुरूचरित्र ॥ Shri GuruCharitra

    गुरूचरित्र अध्याय तिसावा ॥ श्री गुरूचरित्र ॥ Shri GuruCharitra

    गुरूचरित्र अध्याय एकतिसावा ॥ श्री गुरूचरित्र ॥ Shri GuruCharitra

    गुरूचरित्र अध्याय बत्तिसावा ॥ श्री गुरूचरित्र ॥ Shri GuruCharitra

    गुरूचरित्र अध्याय छत्तिसावा ॥ श्री गुरूचरित्र ॥ Shri GuruCharitra

    गुरूचरित्र अध्याय तेहेतिसावा ॥ श्री गुरूचरित्र ॥ Shri GuruCharitra

    गुरूचरित्र अध्याय चौतिसावा ॥ श्री गुरूचरित्र ॥ Shri GuruCharitra

    गुरूचरित्र अध्याय पस्तीसावा ॥ श्री गुरूचरित्र ॥ Shri GuruCharitra

    गुरूचरित्र अध्याय सदोतीसावा ॥ श्री गुरूचरित्र ॥ Shri GuruCharitra

    गुरूचरित्र अध्याय अडोतीसावा ॥ श्री गुरूचरित्र ॥ Shri GuruCharitra

    गुरूचरित्र अध्याय एकोणचाळीसावा ॥ श्री गुरूचरित्र ॥ Shri GuruCharitra

    गुरूचरित्र अध्याय चाळीसावा ॥ श्री गुरूचरित्र ॥ Shri GuruCharitra

    गुरूचरित्र अध्याय एक्केचाळीसावा ॥ श्री गुरूचरित्र ॥ Shri GuruCharitra

    गुरूचरित्र अध्याय बेचाळीसावा ॥ श्री गुरूचरित्र ॥ Shri GuruCharitra

    गुरूचरित्र अध्याय त्रेचाळीसावा - गुरुचरित्र मराठी

    गुरूचरित्र अध्याय चव्वेचाळीसावा - गुरुचरित्र मराठी

    गुरूचरित्र अध्याय पंचेचाळीसावा - गुरुचरित्र मराठी

    गुरूचरित्र अध्याय शेहेचाळीसावा - गुरुचरित्र मराठी

    गुरूचरित्र अध्याय सत्तेचाळीसावा - गुरुचरित्र मराठी

    गुरूचरित्र अध्याय अठ्ठेचाळीसावा - गुरुचरित्र मराठी

    गुरूचरित्र अध्याय एकोणपन्नासावा - गुरुचरित्र मराठी

    गुरूचरित्र अध्याय पन्नासावा - गुरुचरित्र मराठी

    गुरूचरित्र अध्याय एक्कावन्नावा - गुरुचरित्र मराठी

    गुरूचरित्र अध्याय बावन्नावा - अवतर्णिका - गुरुचरित्र मराठी

    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा

    वॉलपेपर

    promo banner 1 image
    promo banner 1 image
    promo banner 1 image
    promo banner 1 image
    Loading...