मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    आरती वटसावित्रीची

    अश्वपती पुसता झाला ।।

    नारद सांगताती तयाला ।।

    अल्पायुषी सत्यवंत ।।

    सावित्रीनें कां पणीला ।।

    आणखी वर वरी बाळे ।।

    मीं निश्चय जो केला ।।

    आरती वडराजा ।। १ ।।

    दयावंत यमदूता ।।

    सत्यवंत ही सावित्री ।।

    भावे करीन मी पूजा ।।

    आरती वडराजा ।। धृ० ।।

    जेष्ठमास त्रयोदशी ।।

    करिती पूजन वडाशीं ।।

    त्रिरात्र व्रत करुनियां ।। 

    जिंकिसी तूं सत्यवंतासी ।।

    आरती वडराजा ।। २ ।।

    स्वर्गावरी जाऊनियां ।।

    अग्निखांब कचळीला ।।

    धर्मराज उचकला ।।

    हत्या घालील जीवाला ।।

    येई गे पतिव्रते ।।

    पति नेई गे आपुला ।।

    आरती वडराजा ।। ३ ।।

    जाऊनियां यमापाशीं ।।

    मागतसे आपला पती ।।

    चारी वर देऊनियां ।।

    दयावंत द्यावा पती ।।

    आरती वडराजा ।। ४ ।।

    पतिव्रते तुझी कीर्ति ।।

    ऐकुनि ज्या नारी ।।

    तुझे व्रतें आचरती ।।

    तुझीं भुवने पावती ।।

    आरती वडराजा ।।५ ।।

    पतिव्रते तुझी स्तुती ।।

    त्रिभुवनीं ज्या करीती ।।

    स्वर्गी पुष्पवृष्टी करुनियां ।।

    आणिलासी आपुला पती ।।

    अभय देऊनियां ।।

    पतिव्रते तारी मजसी ।।

    आरती वडराजा ।। ६ ।।​

    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा

    वॉलपेपर

    promo banner 1 image
    promo banner 1 image
    promo banner 1 image
    promo banner 1 image
    Loading...