मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.
विठ्ठलाची आरती
येई गे विठ्ठले माझे माउलीचे ।।
निढळावरी कर ठेवुनि वाट मी पाहें ।॥ धृ० ।।
आलिया गेलिया हातीं धाडीं निरोप ।।
पंढरपुरीं आहे माझा मायबाप ।। येई० ।। १ ।।
पिवळा पीतांबर कैसा गगनीं झळकला ।।
गरुडावरी बैसूनि माझा कैवारी आला ।। येई० ।। २ ।।
विठोबाचें राज्य आम्हां नित्य दिपवाळी ।।
विष्णुदास नामा जीवें भावें ओवाळीं ।। येई० ।। ३ ।।
महत्वाचे संग्रह
वॉलपेपर




Loading...