मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.
विडा
विडा घ्या हो नारायणा ।।
कृष्णा जगत्रयजीवना ।।
विनविते रखुमाई ।।
दासी होईन मी कान्हा ।। धृ० ।।
शांति हे नागवेली ।।
पानें घेऊनियां करीं ।।
मीपणा जाळूनीयां ।।
चुना लाविला वरी ।। विडा० ।। १ ।।
वासना फोडूनियां ।।
चूर्ण केली सुपारी ।।
भावार्थ कापुरानें ।।
घोळियेली निर्धारीं ।। विडा० ।। २ ।।
विवेक हा कातरंग ।।
रंगीं रंगला सुरंग ।।
वैराग्य जायफळ ।।
मेळविलेंहि अभंग ।। विडा० ।। ३ ।।
दया हे जायपत्री ।।
क्षमा लवंगा आणियेल्या ।।
सुबुद्धि वेलदोडे ।।
शिवरामे अर्पियेले ।। ४ ।।
महत्वाचे संग्रह
वॉलपेपर




Loading...