मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    श्रीतुळशीची आरती

    जय देवी जय देवी जय माये तुळशी ।।

    निजपत्राहुनि लघुतर त्रिभुवन हें तुळिसी ।। धृ० ।।

    ब्रह्मा केवळ मुळीं मध्यें तो शौरी ।।

    अग्रीं शंकर तीर्थे शाखापरिवारीं ।।

    सेवा करिती भावें सकळही नरनारी ।।

    दर्शनमात्रे पापें हरती निर्धारीं ।।

    जय देवी जय देवी० ।। १ ।।

    शीतळ छाया भूतळ व्यापक तूं कैसी ।।

    मंजरीची आवड कमलारमणासी ।।

    तव दलविरहित विष्णू राहे उपवासी ।।

    विशेष महिमा तुझा शुभ कार्तिकमासी ।।

    जय देवी जय देवी० ।। २ ।।

    अच्युत माधव केशव पीतांबरधारी ।।

    तुझिया पूजनकाळीं जो हें उच्चारी ।।

    त्यासी देसी संतति संपत्ति सुखकारी ।।

    गोसावीसुत विनवी मजला तू तारीं ।। जय देवी जय देवी० ।। ३ ।​

    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा

    वॉलपेपर

    promo banner 1 image
    promo banner 1 image
    promo banner 1 image
    promo banner 1 image
    Loading...