मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    तुळजाभवानी मंदिर - तुळजापुर


    श्री तुळजाभवानी मंदिर इतिहास

    श्री सकंद पुराणात या देवीची अवतार कथा खालीलप्रमाणे दिलेली आढळते. कृत युगात कर्दम ऋषींचे मृत्यू नंतर त्यांची पत्नी अनुभूती हिने पती बरोबर सहगमन करणेचे ठरविले. परंतु तिला अल्पवयी मुलगा असल्याने इतर ऋषीमुनींनी तिची समजूत घातल्याने अल्पवयी मुलासाठी तिने तो बेत रहित केला व मंदाकिनी नदीवर तटावर ती तपश्चर्या करू लागली. त्या समयी कुकर नाम दैत्याने तिचे तापाचा व पतिव्रत्याचा भंग करण्याचा प्रयत्न केला. अनुभूतीने संकट समयी श्री भगवतीचा धावा केला व श्री भगवतीने अवतार धारण करून त्या दुष्ट दैत्याचा वध केला व अनुभूतीचे विनंतीवरून यमुनाचल (बाला घाट) पर्वतावर अखंड वास्तव केले.

    • भारतात त्रिगुणात्मक आदिशक्तीची तीन स्थाने १. महाकाली, कलकत्ता तमोगुणात्मक , २. श्री महालक्ष्मी, कोल्हापूर रजोगुणात्मक ३. महासरस्वती, माहूर सत्वात्मक प्रसिद्ध आहेत.
    • श्री भवानीचे स्थान त्रिगुणात्मक म्हणजेच वरील तिन्ही अंशाचे अधिष्ठान समजले जाते.
    • प्रभूरामचंद्राना वनवासात असताना सीतामाईचे शोधात श्री भगवतीने दर्शन देऊन सीतामाईचा लवकरच शोध लागेल असा आशीर्वादही दिला होता.


      दैनंदिन पुजा - सविस्तर माहिती

      सकाळी ६ वाजता देवीस पंचामृत अभिषेक घालतात.या वेळी देवीस मध , केळी , साखर , लिंबू आणि दही लावतात. स्नानाकरिता गोमुखाचे पाणी वापरतात. या पूजेच्या वेळी भक्त आपल्या इच्छेनुसार दुध दही यांचे सिंहासन पूजा,श्रीखंड तसेच आमरस , उसाचा रस यांनी स्नान घालून सिंहासन भरतात म्हणून याला सिंहासन पूजा असे म्हटले जाते. धुपारती : दुपारी पूजारी व भक्त देवीची आरती म्हणतात. ऊद कपूर लावून हि आरती केली जाते.

      चरणतीर्थ काकडा आरती

      चरणतीर्थ : प्रात:काळी ०४.३० वाजता

      अभिषेक पूजा

      ​अभिषेक पूजा : सकाळी ०६.०० ते १०.०० वाजता

      वस्त्रालंकार पूजा आरती व धुपारती

      ​वस्त्रालंकार पूजा आरती व धुपारती : सकाळी ११.०० वाजता

      अभिषेक पूजा

      अभिषेक पूजा : सायंकाळी ०७.०० ते ०९.००

      वस्त्रालंकार पूजा आरती व धुपारती रात्री प्रक्षाळ पूजा

      रात्री ०९.३० वाजता

      चरणतीर्थ

      गर्दीच्या वेळी मा. अध्यक्ष यांच्या परवानगीने : रात्री ०१ वाजता चरणतीर्थ

      • गर्दीच्या वेळी पूजेच्या वेळात गरजेनुसार बदल करण्यात येतात.


      श्री तुळजाभवानी मंदिराकडे कसे पोहचायचे

      • बस सेवा – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ
      • १) तुळजापूर - धाराशिव (दर अर्ध्या तासाला)

      • २) तुळजापूर - सोलापूर (दर अर्ध्या तासाला)

      • ३) तुळजापूर - बार्शी (दर अर्ध्या तासाला)

      • ४) तुळजापूर - लातूर (दर अर्ध्या तासाला)

    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा

    वॉलपेपर

    promo banner 1 image
    promo banner 1 image
    promo banner 1 image
    promo banner 1 image
    Loading...