मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    श्रीरामचंद्राची आरती

    उत्कट साधुनि शिळा सेतू बांधोनी।

    लिंगदेह लंकापुर विध्वंसूनी। कामक्रोधादिक राक्षस मर्दूनी ।

    देह- अहंभाव रावण निवटोनी ।। १ ।।

    जय देव जय देव जय निजबोधा रामा।

    परमार्थे आरती, सद्भावें आरती परिपूर्णकामा ।। ध्रु० ।।

    प्रथम सीताशुद्धी हनुमंत गेला।

    लंका दहन करूनी अखया मारिला ।

    मारिला जंबूमाळी भुवनी त्राहाटीला।

    आनंदाची गूढी घेऊनियां आला ।। जय० ।। २ ।।

    निजबळे निजशक्ती सोडविली सीता ।

    म्हणुनी येणें झालें अयोध्ये रघुनाथा।

    आनंदे वोसंडे वैराग्य भरता।

    आरती घेउनि आली कौसल्या माता ।। जय० ।। ३ ।।

    अनाहतध्वनी गर्जति अपार ।।

    अठरा पझें वानर करिती भुभःकार।

    अयोध्येसी आले दशरथकुमार।

    नगरीं होत आहे आनंद थोर ।। जय० ।। ४ ।।

    सहज सिंहासनी राजा रघुवीर।

    सोहंभावें तया पूजा उपचार।

    सहजांची आरती वाद्यांचा गजर ।

    माधवदासा स्वामी आठव ना विसर।

    जय देव जय देव जय निजबोधा रामा।

    परमार्थे आरती सद्भावें ।। ५ ।।​

    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा

    वॉलपेपर

    promo banner 1 image
    promo banner 1 image
    promo banner 1 image
    promo banner 1 image
    Loading...