मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    श्रीकृष्णाची आरती

    ओंवाळू आरती मदनगोपाळा ।

    श्यामसुंदर गळां वैजयंतीमाळा ।। धृ० ।।

    चरणकमल ज्याचे अति सुकुमार।

    ध्वजवज्रांकुश ब्रीदांचे तोडर ।। १ ।।

    नाभिकमलीं ज्याचे ब्रह्मयाचें स्थान ।

    हृदयीं पदक शोभे श्रीवत्सलांच्छन ।। २ ।।

    मुखकमल पाहतां सुखाचिया कोटी।

    वेधले मानस हारपली दृष्टी ।। ३ ।।

    जडित मुगुट ज्याचा देदीप्यमान ।

    तेणें तेजें कोंदलें अवधें त्रिभुवन ।। ४ ।।

    एका जनार्दनी देखियेलें रूप।

    रूप पाहता जाहले झालें तद्रूप ।। ५ ।।

    ओंवाळू आरती मदनगोपाळा ।।

    श्यामसुंदर गळां वैजयंतीमाळा ।।​

    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा

    वॉलपेपर

    promo banner 1 image
    promo banner 1 image
    promo banner 1 image
    promo banner 1 image
    Loading...