मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    श्रीविष्णूची आरती

    ​आरती आरती करूं गोपाळा ।

    मीतूंपण सांडोनी वेळोवेळा ।। धृ० ।।

    आवडी गंगाजळें देवा न्हाणीलें ।।

    भक्तीचें भूषण प्रेमसुगंध अर्पीले ।।

    अहं हा धूप जाळू श्रीहरीपुढें ।।

    जंव जंव धूप जळे तंव तंव देवा आवडे ।।

    रमावल्लभदासें सोहंधूप जाळिला ।।

    एका आरतीचा मग प्रारंभ केला ।।

    सोहं हा दीप ओवाळू गोविंदा ।।

    समाधी लागली पाहतां मुखारविंदा ।।

    हरिखें हरीख होतो मुख पाहतां ।।

    प्रकटल्या ह्या नारी सर्वहि अवस्था ।।

    सद्भावालागीं बहु हा देव भुकेला ।।

    रमावल्लभदासें नैवेद्य अर्पिला ।। 

    फल तांबूल पंचज्योति आरती उजळिली ।।

    विश्व हैं लोपलें तया प्रकाशातळीं ।। १ ।।

    आरती प्रकाशें चंद्रसूर्य लोपले ।।

    सुरवर नभीं तेथें तटस्थ ठेले ।।

    देवभक्तपण न दिसे कांही ।।

    ऐशापरी दास रमावल्लभापायीं ।। २ ।।​

    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा

    वॉलपेपर

    promo banner 1 image
    promo banner 1 image
    promo banner 1 image
    promo banner 1 image
    Loading...