मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    श्री रामचंद्र पाळणा

    बाळा जो जो रे,कुलभूषणा । दशरथनंदना ॥

    निद्रा करि बाळा मनमोहना। रामा लक्षुमणा ॥धृ॥ बाळा जो जो रे….

    पाळणा लांबविला, अयोध्येसी । दशरथाचे वंशी ॥
    पुत्र जन्मला हृषीकेशी । कौसल्येचे कुशी ॥१॥ बाळा जो जो रे….

    रत्नजडित पालखी। झळके अलौकिक ।
    वरती पहुडले कुळदीपक । त्रिभुवननायक ॥२॥ बाळा जो जो रे….

    हालवी कौसल्या सुंदरी धरूनि ज्ञानदोरी ॥
    पुष्पे वर्षिली सुरवरी। गर्जती जयजयकारी ॥३॥ बाळा जो जो रे….

    विश्वव्यापकां रघुराया। निद्रा करी वा सखयां ॥
    तुजवर कुरवंडी करुनिया। सांडिन अपुली काया ॥४॥ बाळा जो जो रे….

    येऊनि वसिष्ठ सत्वर । सांगे जन्मांतर ॥
    राम परब्रह्म साचार। सातवा अवतार ॥५॥ बाळा जो जो रे….

    याग रक्षुनिया अवधारा मारूनि रजनीचरा ॥
    जाईल सीतेच्या स्वयंवरा उद्धरी गौतमदारा॥६॥ बाळा जो जो रे….

    परिणिल जानकी सुरूपा भंगुनिया शिवचापा ॥
    रावण लज्जित महाकोपा नव्हे पण हा सोपा ॥७॥ बाळा जो जो रे….

    सिंधुजलडोही अवलीळा । नामे तरतिल शिला ॥
    त्यांवरी उतरूनिया दयाळां।नेईल वानरमेळा ॥८॥ बाळा जो जो रे….

    समूळ मर्दूनि रावण । स्थापिल विभीषण ॥
    देव सोडवील संपूर्ण। आनंदेल त्रिभुवन ॥९॥ बाळा जो जो रे….

    राम भावाचा भुकेला। भक्ताधीन झाला
    दास विठ्ठले ऐकिला। पाळणा गाईला ॥१०॥ बाळा जो जो रे….​

    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा

    वॉलपेपर

    promo banner 1 image
    promo banner 1 image
    promo banner 1 image
    promo banner 1 image
    Loading...