मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    श्रीपांडुरंगाची आरती

    जय देव जय देव जय पांडुरंगा।

    आरती ओवाळू भावे जिवलगा ।। ध्रु० ।।

    पंढरीक्षेत्रासी तूं अवतरलासी ।

    जगदुद्धारासाठी राय तूं फिरसी ।

    भक्तवत्सल खरा तू एक होसी ।

    म्हणुनी शरण आलो तुझे चरणांसी ।। १ ।।

    त्रिगुण परब्रह्म तुझा अवतार।

    त्याची काय वर्ण लीला पामर 

    शेषादिक शिणले त्यां न लगे पार ।

    तेथे कैसा मूढ मी करूं विस्तार ।। २ ।।

    देवाधिदेवा तूं पंढरीराया।

    निर्जर मुनिजन ध्याती भावें तव पायां।

    तुजसी अर्पण केली आपुलि मी काया।

    शरणागता तारी तूं देवराया ।। ३ ।।

    अघटित लीला करूनी जड मूढ उद्धरिले ।

    कीर्ती ऐकुनि कानी चरणी मी लोळें ।

    चरणप्रसाद मोठा मज हे अनुभवले ।

    तुझ्या भक्तां न लगे चरणांवेगळे ।

    जय देव जय देव जय पांडुरंग ।। आरती० ।। ४ ।।​

    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा

    वॉलपेपर

    promo banner 1 image
    promo banner 1 image
    promo banner 1 image
    promo banner 1 image
    Loading...