मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    श्रीजिवतीची आरती

    जयदेवी जयदेवी जय जिवती जननी।

    सुखी ठेवी संतति विनति तव चरणी ।। ध्रु० ।।

    श्रावण येतांचि आणूं प्रतिमा गृहात स्थापुनि करूं पूजना आघाडा दुर्वा माळा वाहू या।

    अक्षता घेऊन कहाणी सांगू या।

    जय देवी जय देवी जय जिवति जननी।

    सुखी ठेवी संतति विनति तव चरणी ।। १ ।।

    पुरणपोळीची नैवेद्य दाबूं। सुवासिनींना भोजन देऊं ।

    चणे हळदीकुंकू दूधहि देऊं ।

    जमूनि आनंदे आरती गाऊ ।

    जय देवी जय देवी जय जिवती जननी ।

    सुखी ठेवी संतति विनति तव चरणीं ।। २ ।।

    सटवीची बाधा होई बाळांना ।।

    सोडवी तीतून तूचि तयांना। माता या तुजला करिती प्रार्थना।

    पूर्ण ही करी मनोकामना । जय देवी जय देवी जय जिवति जननी ।

    ठेवी सुखी संतति विनति तव चरणी ।। ३ ।।

    तुझिया कृपेनें सौख्य नांदू दे।

    वंशाचा वेल नीट वाढू दे। सेवा हें व्रत नित्य घडू दे।

    मनींचे हेतू पूर्ण होऊ दे ।

    जय देवी जय देवी जय जिवति जननी ।

    सुखी ठेवी संतति विनति तव चरणी ।।४।।​

    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा

    वॉलपेपर

    promo banner 1 image
    promo banner 1 image
    promo banner 1 image
    promo banner 1 image
    Loading...