मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.
श्रीदत्ताची आरती
त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा ।
त्रिगुणी अवतार त्रैलोक्यराणा ।
नेति नेति शब्द न ये अनुमाना।
सुरवर मुनिजन योगी समाधि न ये ध्याना ।। १ ।।
जय देव जय देव जय श्रीगुरुदत्ता ।।
आरती ओळावीतां हरली भवचिंता ।। धृ० ।।
सबाह्य अभ्यंतरीं तूं एक दत्त।
अभाग्यासी कैंची कळे ही मात ।।
पराही परतली तेथें कैंचा हेत ।
जन्ममरणाचा पुरलासे अन्त ।। जय० ।। २ ।।
दत्त येउनियां उभा ठाकला ।
सद्भावे साष्टांगें प्रणिपात केला ।
प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला ।
जन्ममरणाचा फेरा चुकविला ।। जय० ।। ३ ।।
दत्त दत्त ऐसे लागलें ध्यान ।
हरपलें मन झालें उन्मन।
मीतूंपणाची झाली बोळवण ।
एका जनार्दनीं श्रीदत्त जाण ।। ४ ।।
जय देव जय देव जय० ।।
महत्वाचे संग्रह
वॉलपेपर




Loading...