मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    श्रीबहिरोबाची आरती

    जय देव जय देव जय भैरवनाथा ।

    सुंदर पदयुग तुझे वंदन निजमाथां ।। ध्रु० ।।

    भैरवनाथा गौरव दे मज भजनाचे ।

    गौरव संकट नाशी जननानिधनाचे।

    निशिदिनीं देवा दे मज गुणकीर्तन वाचे।

    कैरव पदनखचंद्री करिं मन मम साचें ।। जय० ।। १ ।।

    भवभयभंजन सज्जनरंजन गुरुदेवा ।

    पदरज अंजन लेतां प्रकटे निजठेवा।

    जेव्हा दर्शन देसी भाग्योदय तेव्हां ।

    अनंत पुण्ये साधे लाधे तव सेवा ।। जय० ।। २ ।।

    कलिमलशमना दानवदमना दे पाणी।

    डमरुवर अमरांते निर्भय सुखदानी।

    काशीरक्षक तक्षकमालाधर चरणीं ।

    तोडर मिरवी अरिगण मस्तकि मनकर्णि ।। जय० ।। ३ ।।

    लक्षीं करुणाचक्षीं अनुचर निजपक्षी।

    भक्षी दुष्टा नष्टां सुष्टां संरक्षी ।

    साक्षी कर्माकर्मी जगदंतरकुक्षी ।

    मुमक्षुपक्षी वसती तव पदसुरवृक्षी ।। जय० ।। ४ ।।

    सोनारीं पुरधामी भैरव कुलस्वामीं।

    स्मरतां सत्वर पावसि संकटहरनामी ।

    इच्छित देसी दासां जो जो जें कामी।

    मुक्तेश्वरीं हेतू निश्चल कुळधर्मी ।। जय० ।। ५ ।।​

    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा

    वॉलपेपर

    promo banner 1 image
    promo banner 1 image
    promo banner 1 image
    promo banner 1 image
    Loading...