मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.
शंकराची आरती
ॐ
लवथवती विक्राळा ब्रह्मांडीं माळा ।।
विषं कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ।।
लावण्यसुंदर मस्तकीं बाळा ।।
तेथुनियां जळ निर्मळ वाहे झुळझूळां ।। १ ।।
जय देव जय देव श्रीशंकरा ।।
आरती ओवाळू तुज कर्पूरगौरा ।। धृ० ।।
कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा ।।
अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा ।।
विभूतीचें उधळण शितिकंठ नीळा ।।
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ।। २ ।।
देंवी दैत्यीं सागरमंथन पैं केलें ।।
त्यामाजीं अवचित हलाहल उठिलें ।
तें त्वां असुरपणें प्राशन केलें ।।
नीलकंठ नाम प्रसिद्ध झालें ।। ३ ।।
व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।।
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ।।
शतकोटींचें बीज वाचे उच्चारी ।।
रघुकुळटिळक रामदासा अंतरीं ।। ४ ।।
महत्वाचे संग्रह
वॉलपेपर




Loading...