मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    श्रीशनिदेवाची आरती

    जय जय श्रीशनिदेवा ।।

    पद्मकर शिरीं ठेवा ।।

    आरती ओंवाळीतों ।।

    मनोभावें करूनी सेवा ।। धृ० ।।

    सूर्यसुता शनिमूर्ती ।।

    तुझी अगाध कीर्ती ।।

    एकमुखे काय वर्णं ।।

    शेषा न चले स्फूर्ती ।। जय० ।। १ ।।

    नवग्रहांमाजी श्रेष्ठ ।।

    पराक्रम थोर तुझा ।।

    ज्यावरी कृपा करिसी ।।

    होय रंकाचा राजा ।। जय० ।। २ ।।

    विक्रमासारीखा हो ।।

    शककर्ता पुण्यराशी ।।

    गर्व धरितां शिक्षा केली ।।

    बहु छळियेलें त्यासी ।। जय ० ।। ३ ।।

    शंकराच्या वरदानें ।।

    गर्व रावणें केला ।।

    साडेसाती येतां त्यासी ।।

    समूळ नाशासी नेला ।। जय० ।। ४ ।।

    प्रत्यक्ष गुरुनाथा ।।

    चमत्कार दावियेला ।।

    नेउनी शूळापाशी ।।

    पुन्हा सन्मान केला ।। जय० ।। ५ ।।

    ऐसे गुण किती गाऊं ।।

    धणी न पुरे गातां ।।

    कृपा करीं दीनावरी ।।

    महाराजा समर्था ।। जय० ।। ६ ।।

    दोनी कर जोडोनियां ।।

    रखमा लीन सदा पायीं ।।

    प्रसाद हाचि मागे ।।

    उदयकाळ सौख्य दावीं ।। जय० ।। ७ ।​

    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा

    वॉलपेपर

    promo banner 1 image
    promo banner 1 image
    promo banner 1 image
    promo banner 1 image
    Loading...