मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    श्रीसत्यनारायणाची आरती

    जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा।

    पंचारति ओंवाळू श्रीपति तुज भक्तीभावा ।। जय ।। ।। धृ० ।।

    विधियुक्त पूजुनी करिती पुराण

    श्रवण परिमळद्रव्यांसहित पुष्पमाळा अर्पून ।

    घृतयुक्त शर्करामिश्रित गोधूमचूर्ण। प्र

    साद भक्षण करितां प्रसन्न तू नारायण ।। जय० ।। १ ।।

    शतानंदविप्रें पूर्वी व्रत हैं आचरिलें।

    दरिद्र दवडुनि अंतीं त्यातें मोक्षपदा नेलें ।।

    त्यापासूनि हें व्रत या कलियुगीं सकळां श्रुत झालें।

    भावार्थे पूजितां सर्वां इच्छित लाधलें ।॥ जय० ।। २ ।।

    साधुवैश्यें संततिसाठीं तुजला प्रार्थियलें।

    इच्छित पुरतां मदांध होऊनि व्रत न आचरिलें ।

    त्या पापानें संकटी पडुनी दुःखहि भोगिलें।

    स्मृति होउनि आचरितां व्रत त्या तुवांचि उद्धरिलें ।॥ जय० ॥ ३॥

    प्रसाद विसरुनि पतिभेटीला कलावती गेली।

    क्षोभ तुझा होतांचि तयाचि नौका बुडाली।

    अंगध्वजराजाची यापरि दुःखस्थिती आली।

    मृतवार्ता शतपुत्रांची सत्वर कर्णी परिसली ।। जय० ।। ४ ।।

    पुनरपि पूजुनि प्रसाद ग्रहण करितां तत्क्षणीं।

    पतिची नौका तरली देखे कलावती नयनीं।

    अंगध्वजरायासी पुत्र भेटति येऊनि ।

    ऐका भक्तां संकटि पावसि तूं चक्रापाणी ।। जय० ।।५।।

    अनन्यभावें पूजुनि हें व्रत जे जन आचरति ।

    इच्छित पुरविसी त्यातें देउनि संतति संपत्ती ।

    संहरती भवदुरितें सर्वहि बंधनें तुटती।

    राजा रंका समान मानुनि पावसि श्रीपती ।। जय० ।। ६ ।।

    ऐसा तव व्रतमहिमा अपार वर्णं मी कैसा ।।

    भक्तीपुरस्सर आचरती त्यां पावसि जगदीशा।

    भक्तांचा कनवाळू कल्पद्रुम तूं सर्वेशा ।

    मोरेश्वरसुत वासुदेव तुज विनवी भवनाशा ।।

    जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा० ।। ७ ।।​

    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा

    वॉलपेपर

    promo banner 1 image
    promo banner 1 image
    promo banner 1 image
    promo banner 1 image
    Loading...