मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    श्री संतोषीमातेची आरती

    जय देवी श्रीदेवी संतोषी माते।

    वंदन भावें माझे तव पद कमला ते ।। ध्रु० ।।

    श्रीलक्ष्मीदेवी तूं श्रीविष्णुपत्नी ।।

    पावसि भक्तालागी अति सोप्या यत्नी ।।

    जननी विश्वाची तूं जीवनचित्रशक्ती।

    शरण तुला मी आलो नुरवी आपत्ती ।। १ ।।

    भृगुवारी श्रद्धेने उपास तव करिती ।

    आंबट कोणी काही अन्न न सेवीती ।।

    गूळचण्याचा साधा प्रसाद भक्षीती।

    मंगल व्हावें म्हणुनी कथा श्रवण करिता ।। २ ।।

    जे कोणी नरनारी व्रत तव आचरिती ।

    अनन्य भावे तुजला स्मरुनी प्रार्थीती ।।

    त्यांच्या हाकेला तू धावुनिया येसीं।

    संतति वैभव कीर्ती धनदौलत देसी ।। ३ ।।

    विश्वाधारे माते प्रसन्न तू व्हावें।

    भवभय हरुनी आम्हां सदैव रक्षावे ।।

    मनिची इच्छा व्हावी परिपूर्ण सगळा ।

    म्हणुनी मिलिंदमाधव आरती ओवाळी ।। ४ ।।​

    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा

    वॉलपेपर

    promo banner 1 image
    promo banner 1 image
    promo banner 1 image
    promo banner 1 image
    Loading...