मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    तुकडोजींचे मंदिर

    ​महाराष्ट्र ही संतांची भूमी म्ह्णून ओखली जाते. या भूमीला अनेक संतांची शिकवण लाभली आहे. या सर्व संतान पैकी एक संत तुकडोजी महाराज. त्यांना राष्ट्रसंत ही उपाधी मिळाली होती. तुकडोजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यात अनेक सामाजिक कार्य केली. तसेच तुकडोजी महाराजांचे मूळ नाव माणिक होते.
    राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म १९०९ मध्ये महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील यावली नावाच्या गावात एका गरीब कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण तेथे व बारखेडा येथे झाले. तुकडोजी महाराजांचे नाव तुकडोजी आहे कारण त्यांनी त्यांचे बालपण भजन गाताना मिळालेल्या दानावर व्यतीत केले. त्यांचे नाव त्यांचे गुरू अडकोजी महाराजांनी दिले होते. ते स्वतःला 'तुकड्यादास' म्हणायचे. तसेच तुकडोजी महाराजांनी 1935 मध्ये मोठा यज्ञ केला होता. त्यामुळे त्यांची ख्याती दूरवर पसरली.

    राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाधी
    राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांचे समाधी मंदिर महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात मोजारी येथे आहे. तुकडोजी महाराजांनी सदैव जनसेवा केली. यामुळे त्यांना "राष्ट्रीय संत" म्हणून ओळखले जाते. तुकडोजी महाराज नेहमी मंदिरात जाऊन गीते गायचे. त्यांची गाणे ऐकून लोक अगदी मंत्रमुग्ध व्हायचे. आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर लोकांची सेवा करण्यासाठी ते आपल्या गावी परत आले. तसेच संत तुकडोजी महाराजांनी केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर प्रवास करून आध्यात्मिक, सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मतेचा उपदेश केला. एवढेच नाही तर 1955 मध्ये त्यांनी जपानसारख्या देशात जाऊन सर्वांना विश्व बंधुतेचा संदेश दिला.

    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा

    वॉलपेपर

    promo banner 1 image
    promo banner 1 image
    promo banner 1 image
    promo banner 1 image
    Loading...