मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    संत मंडळींची आरती

    ​आरती संतमंडळी ।।

    हातीं घेऊनि पुष्पांजली ।

    ओंवाळीन पंचप्राणें ।।

    त्यांचे चरण न्याहाळीं ।। आरती० ॥ धृ०।।

    मच्छेद्र गोरक्ष गैनी निवृत्तिनाथ ।।

    ज्ञानदेव नामदेव ।।

    खेचर विसोबा संत ।।

    सोपान चांगदेव ।।

    गोरा जगमित्र भक्त ।।

    कबीर आणि पाठकनामा ।।

    चोखा परिसा भागवत ।। आ० ।। १ ।।

    भानुदास कृष्णदास ।।

    वडवळसिद्ध नागनाथ ।।

    बहिरा पिसा मुकुंदराज ।।

    केशवस्वामी सूरदास ।।

    रंगनाथ वामनस्वामी ।।

    जनजसवंतदास ।। आ० ।।२।।

    एकनाथ रामदास ।।

    यांचा हरिपदीं वास ।।

    गुरुकृपा संपादली।

    स्वामी जनार्दन त्यास ।।

    मीराबाई मुक्ताबाई ।।

    बहिणाबाई उदास ।।

    सोनार नरहरी हा ।।

    माळी सावता दास ।। आ० ।। ३ ।।

    रोहिदास संताबाई ।।

    जनी राजाई गोणाई ।।

    जोगा परमानंद साल्या ।।

    शेखमहमद भाई ।।

    निंबराजा बोधराज ।।

    माथा तयांचे पायीं ।।

    कूर्मदास शिवदास ।।

    मलुकदास कार्माबाई ।। आ० ।।४।।

    नारा म्हादा गोंदा विठा ।।

    प्रेमळ दामाजीपंत ।।

    तुकोबा गणेशनाथ ।।

    सेना नरसी महंत ।।

    तुळसीदास कसंबया ।।

    पवार संतोबा भक्त ।।

    महिपती तुम्हांपासी ।।

    चरणसेवा मागत ।। आरती० ।।५।।

    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा

    वॉलपेपर

    promo banner 1 image
    promo banner 1 image
    promo banner 1 image
    promo banner 1 image
    Loading...