मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.
श्रीसाईबाबांची आरती
जय देव जय देव जय दत्ता अवधूता।
साई अवधूता ।
जोडूनि कर तव चरणीं ठेवितों माथा ।
जय देव जय देव जय ।। धृ० ।।
अवतरशी तूं येतां धर्मातें ग्लानी।
नास्तिकांनाहि तूं लाविसी निजभजनीं ।
दाविसी नालीला असंख्य रूपांनीं।
हरिसी दीनांचे तूं संकट दिनरजनीं ।। जय ० ।। १ ।।
यवनस्वरूपीं ऐक्या दर्शन त्वां दिधलें।
संशय निरसुनियां तद्वैता घालविलें ।
गोपीचंदा मंदा त्वांची उद्धरिलें।
मोमिनवंशी जन्मुनि लोकां तारियलें ।। जय० ।। २ ।।
भेद न तत्त्वीं हिंदुयवनांचा कांही।
दावायासी झाला पुनरपि नरदेही।
पाहसि प्रेमानें तूं हिंदुयवनांही ।
दाविसी आत्मत्वानें व्यापक हा साई ।। जय० ।। ३ ।।
देवा साईनाथा त्वत्पदनत व्हावें ।
परमायामोहित जनमोचन झणिं व्हावें ।
त्वकृपया सकळांचे संकट निरसावें ।
देशिल तरि दे त्वद्यश कृष्णानें गावें ।। जय० ।। ४ ।।
महत्वाचे संग्रह
वॉलपेपर




Loading...