मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    पांडुरंगाची आरती

    युगें अठ्ठावीस विटेवरी उभा ।।

    वामांगीं रखुमाई दिसे दिव्य शोभा ।।

    पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा ।।

    चरणीं वाहे भीमा उद्धरीं जगा ।। १ ।।

    जय देव जय देव जय पांडुरंगा ।।

    रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावें जिवलगा ।। जय ।। धृ० ।।

    तुळसीमाळा गळां कर ठेवुनि कटीं ।।

    कांसे पीतांबर कस्तुरि लल्लाटीं ।।

    देव सुरवर नित्य येती भेटी । 

    गरुड हनुमंत पुढें उभे राहती ।। जय० ।। २ ।।

    धन्य वेणूनाद अनुक्षेत्रपाळा ।।

    सुवर्णाची कमळे वनमाळा गळां ।।

    राई रखुमाबाई राणीया सकळा ।।

    ओंवाळीती राजा विठोबा सांवळा ।। जय० ।। ३ ।।

    ओंवाळू आरत्या कुरवंड्या येती ।।

    चंद्रभागेमाजी सोडुनियां देती ।।

    दिंड्या पताका वैष्णव नाचती ।।

    पंढरीचा महिमा वर्णावा किती ।। जय० ।। ४ ।।

    आषाढी कार्तिकी भक्तजन येती ।।

    चंद्रभागेमाजीं स्नानें जे करिती ।।

    दर्शन हेळामात्रे तयां होय मुक्ती ।।

    केशवासी नामदेव भावें ओवाळिती ।। ५ ।।​

    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा

    वॉलपेपर

    promo banner 1 image
    promo banner 1 image
    promo banner 1 image
    promo banner 1 image
    Loading...