मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.
श्रीनृसिंहाची आरती
कडकडिले स्तंभ गडगडिलें गगन ।।
अवनी होत आहे कंपायमान ।।
तडतडलीं नक्षत्रं पडताती जाण ।।
उग्ररूपं प्रगटे तो नृसिंहवदन ।। १ ।।
जय देव जय देव जय नरहरिराया ।।
आरती ओंवाळू महाराजवर्या ।। जय० ।। धृ० ।।
एकवीस स्वर्गमाळा डळमळली कैसी ।।
ब्रह्मयाच्या वाटे अभिनव चित्तासी ।।
चंद्रसूर्य दोनी लोपति प्रकाशीं ।।
कैलासीं शंकर दचके मानसीं ।। जय० ।। २ ।।
थरथरती त्या जटा जिव्हां लळलळित ।।
तीक्ष्ण नखांनीं तो दैत्य विदारित ।
अर्धांगीं कमलजा शिरि छाया धरित ।।
माधवदासा स्वामी नरहरि शोभत ।।
जय देव जय देव जय नरहरिराया ।। आरती० ।। ३ ।।
महत्वाचे संग्रह
वॉलपेपर




Loading...