मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    नवरात्रीची आरती

    आश्विनशुद्धपक्षीं अंबा बैसलि सिंहासनीं हो ।।

    प्रतिपदेपासून घटस्थापना ती करुनी हो ।।

    मूलमंत्रजप करुनी भोंवते रक्षक ठेवुनी हो ।।

    ब्रह्मा विष्णु रुद्र आईचें पूजन करिती हो ।। १ ।।

    उदो बोला उदो अंबाबाई माउलीचा हो ।।

    उदोकारें गर्जती काय महिमा वर्णं तिचा हो ।। धृ० ।।

    द्वितीयेचे दिवशीं मिळती चौसष्ट योगिनी हो ।।

    सकळांमध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो कस्तुरी मळवट भांगी शेंदूर भरुनी हो ।।

    उदोकारें गर्जती सकल चामुंडा मिळुनी हो ।। उदो० ।। २ ।।

    तृतीयेचे दिवशीं अंबे शृंगार मांडिली हो ।।

    मळवट पातळ चोळी कंठीं हार मुक्ताफळ हो ।।

    कंठींचीं पदकें कांसे पीतांबर पिवळा हो ।।

    अष्टभुजा मिरविती अंबे सुंदर दिसे लीला हो ।। उदो० ।। ३ ।।

    चतुर्थीच्या दिवशी विश्वव्यापक जननी हो ।।

    उपासकां पाहसी प्रसन्न अंतःकरणीं हो ।।

    पूर्णकृपें तारिसी जगन्माते मनमोहिनी हो।।

    भक्तांच्या माउली सुर ते येती लोटांगणी हो ।। उदो० ।।४।।

    पंचमीचे दिवशी व्रत तें उपांगललिता हो ।।

    अर्घ्यपाद्यपूजनें तुजला भवानी स्तविती हो ।।

    रात्रीचे समयीं करिती जागरण हरिकथा हो ।।

    आनंदे प्रेम तें आलें सद्भावे क्रीडतां हो ।। उदो० ।।५।।

    षष्ठीचे दिवशी भक्तां आनंद वर्तला हो ।।

    घेऊनि दिवट्या हस्तीं हर्षे गोंधळ घातला हो ।।

    कवडी एक अर्पितां देशी हार मुक्ताफळा हो ।।

    जोगवा मागतां प्रसन्न झाली भक्तकुळा हो ।। उदो० ।। ६ ।।

    सप्तमीचे दिवशी सप्तशृंगगडावरी हो ।।

    तेथें तूं नांदसी भोंवती पुष्पें नानापरी हो ।।

    जाईजुईशेवंती पूजा रेखियली बरवी हो ।।

    भक्त संकटीं पडतां झेलुनि घेसी वरचेवरी हो ।। उदो० ।। ७ ।।

    अष्टमीचे दिवशीं अष्टभुजा नारायणी हो ।।

    सह्याद्रीपर्वती राहिली उभी जगज्जननी हो ।।

    मन माझें मोहिलें शरण आलों तुजलागुनी हो ।।

    स्तनपान देउनी सुखी केलें अंतःकरणीं हो ।। उदो० ।। ८ ।।

    नवमीचे दिवशीं नव दिवसांचे पारणें हो ।।

    सप्तशतीजप होमहवनें सद्भक्ती करुनी हो ।।

    षड्सअन्ने नैवेद्यासी अर्पियेलीं भोजनीं हो ।।

    आचार्य ब्राह्मणां तृप्त केलें त्वां कृपेंकरुनी हो ।। उदो० ।। ९ ।।

    दशमीच्या दिवशीं अंबा निघे सीमोल्लंघनीं हो ।।

    सिंहारुढ करिं दारुण शस्त्रं अंबें त्वां घेउनी हो ।।

    शुंभनिशुंभादिक राक्षसां कितीं मारिसी रणीं हो ।।

    विप्रा रामदासा आश्रय दिधला तो चरणीं हो ।। उदो० ।। १० ।।​

    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा

    वॉलपेपर

    promo banner 1 image
    promo banner 1 image
    promo banner 1 image
    promo banner 1 image
    Loading...