मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    Mokshada Ekadashi Katha In Marathi : मोक्षदा एकादशीनिमित्त वाचा कथा, मिळेल पूर्वजांना मोक्षासह पुण्य...

    Mokshada Ekadashi Vrat Katha :

    मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला मोक्षदा एकादशी म्हणतात. यंदा ही एकादशीची तिथी ११ डिसेंबरला असणार आहे. या दिवशी भगवान विष्णूची पूजा आणि उपासना केल्याने अनेक मनोकामना पूर्ण होतात. तसेच आपल्याला मोक्ष देखील मिळतो असे पुराणात म्हटले आहे. तसेच या दिवशी भगवान श्रीकृष्णाने महाभारतातील कुरुक्षेत्रात अर्जुनाला गीतेचे ज्ञान दिले होते त्यामुळे गीता जयंतीदेखील साजरी केली जाते. जाणून घेऊया मोक्षदा एकादशीची पौराणिक कथागोकुळ नावाच्या नगरात वैखानस नावाचा राजा राज्य करत होता. त्या राज्यात चार वेद जाणणारे ब्राह्मण राहात होते. राजा प्रजाहितदक्ष होता. एकदा रात्री राजाला स्वप्न पडले, त्यात त्याचे वडील त्याला नरकात दिसेल. सकाळी उठताच त्यांने ब्राह्मणांकडे धाव घेतली आणि आपले स्वप्न सांगितले. राजा म्हणाला मी माझ्या वडिलांना नरकयातना भोगताना पाहिले आहे. ते म्हणाले मुला... मी नरकात पडून आहे. मला येथून मुक्त कर. त्यांचे हे शब्द ऐकल्यापासून मी खूप अस्वस्थ आहे.मला या राज्यामध्ये सुख, संपत्ती, पुत्र, स्त्री, हत्ती, घोडा वगैरे कशातही सुख दिसत नाही. काय करायचं? राजा म्हणाला - हे ब्राह्मण देवता ! या दु:खाने माझे संपूर्ण शरीर जळत आहे. तुम्ही कृपया मला काही तप, दान, व्रत वगैरे उपाय सांगा म्हणजे माझ्या पित्याला मोक्ष मिळेल. अन्यथा माझे जीवन निरर्थक होईल.ब्राह्मण म्हणाले - हे राजा ! जवळच भूत, भविष्य आणि वर्तमान जाणून घेणार्‍या पर्वत ऋषींचा आश्रम आहे. ते तुमची समस्या नक्कीच सोडवतील. हे ऐकून राजा ऋषींच्या आश्रमात गेला. त्या आश्रमात अनेक शांत मनाचे योगी आणि ऋषी तपश्चर्या करत होते. पर्वत ऋषी त्याच ठिकाणी बसले होते. राजाने ऋषींना साष्टांग नमस्कार केला. ऋषींनी राजाकडून कार्यक्षमतेचा समाचार घेतला.राजा म्हणाला ऋषीमुनींनो, तुमच्या कृपेने माझ्या राज्यात सर्व काही ठीक आहे. पण अचानक मला फार अस्वस्थ वाटतंय. हे ऐकून पर्वत ऋषींनी डोळे मिटून भुतकाळाचा विचार करु लागले. मग ऋषी म्हणाले राजा! योगसामर्थ्याने मला तुझ्या वडिलांचे दुष्कृत्य कळाले आहे. मागच्या जन्मी कामुक होऊन एका बायकोला त्याने रती दिली, पण त्याने त्याच्या बायकोला फार त्रास दिला. त्याच्या पापीकृत्यामुळे तुझ्या वडिलांना नरकात जावे लागले. राजा म्हणाला ऋषी कृपा मला काही उपाय सांगा.ऋषी म्हणाले - हे राजा ! मार्गशीर्ष एकादशीचे व्रत करून त्या व्रताचे पुण्य आपल्या वडिलांकडे सोडवावे. त्याच्या प्रभावाने, तुझे वडील नक्कीच नरकापासून मुक्त होतील. मुनिचे हे वचन ऐकून राजा राजवाड्यात आला आणि ऋषींच्या सांगण्यानुसार कुटुंबासह मोक्षदा एकादशीचे व्रत पाळले. आपल्या व्रताचे पुण्य त्यांनी वडिलांना अर्पण केले.या प्रभावामुळे वडिलांना मोक्ष मिळाला आणि स्वर्गात जाताना ते पुत्राला म्हणू लागले - हे पुत्रा, तुझे कल्याण होवो. असे म्हणत ते स्वर्गात गेला. मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील मोक्षदा एकादशीचे व्रत करतात त्यांची सर्व पापे नष्ट होतात. ही कथा वाचल्याने किंवा श्रवण केल्याने वायपेय यज्ञाचे फळ मिळते.

    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा

    वॉलपेपर

    promo banner 1 image
    promo banner 1 image
    promo banner 1 image
    promo banner 1 image
    Loading...