मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    श्रीमंगळागौरीची आरती

    जयदेवी मंगळागौरी।

    ओंवाळीन सोनिया ताटीं।

    रत्नांचे दिवे ।

    माणिकांच्या वाती।

    हिरेया मोती ज्योती ।। धृ० ।।

    मंगलमूर्ती उपजली कार्या।

    प्रसन्न झाली अल्पायुषी राया।

    तिष्ठली राज्यबाळी।

    आयोपण द्यावया ।। जय० ।। १ ।।

    पूजेला ग आणिती जाई जुईच्या कळ्या ।

    सोळा तिकटीं सोळा दूर्वा ।

    सोळा परींची पत्री।

    जाई जुई आबुल्याशेवंती नागचाफें ।।

    पारिजातकें मनोहरें। गोकर्ण महाफुलें ।।

    नंदेटें तगरें।

    पूजेला ग आणिलीं ।। जय० ।। २ ।।

    साळीचे तांदूळ मुगाची डाळ।

    आळणी खिचडी रांधिती नारी।

    आपुल्या पतिलगीं।

    सेवा करिती फार ।। जय० ।। ३ ।।

    डुम डुम डुम डुम वाजंत्री वाजती।

    कळावी कांकणें गौरीला शोभती ।

    शोभती बाजुबंद।

    कानीं कापांचे गवे।

    ल्यायिली अंबा शोभे ।। जय० ।। ४ ।।

    न्हाऊनी माखुनी मौनी बैसली ।

    पाटावाची चोळी क्षीरोदक नेसली।

    स्वच्छ बहुत होउनी।

    अंबा पूजू लागली ।। जय० ।। ५ ।।

    सोनियाच्या ताटीं घातिल्या पंचारती ।

    मध्यें उजळती कापुराच्या वाती।

    करा धूप दीप।

    आतां नैवेद्य षड्स पक्कानें।

    ताटी भरा बोनें ।। जय० ।। ६ ।।

    लवलाह तिधें काशीसी निघालीं माउली मंगळागौर भिजवू विसरली ।

    मागुती परतुनियां आली।

    अंबा स्वयंभू देखिली।

    देऊळ सोनियाचे ।

    खांब हिरेयांचे।

    कळस मोतियांचा ।। जय० ।। ७ ।।​

    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा

    वॉलपेपर

    promo banner 1 image
    promo banner 1 image
    promo banner 1 image
    promo banner 1 image
    Loading...