मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.
आरती महालक्ष्मीची
जयदेवी जयदेवी जय लक्ष्मीमाता ।
प्रसन्न होऊनिया वर देई आता ।। धृ० ।।
विष्णुप्रिये तुझी सर्वांतरी सत्ता।
धन दौलत देई लक्ष्मीव्रत करिता ।। १ ।।
विश्वव्यापक जननी तुज ऐसी नाही।
धावसी आम्हालागी पावली लवलाही ।। २ ।।
त्रैलोक्यधारिणी तू भक्ता लाभे सुखशांती।
सर्व सर्वही दुःख सर्व ती पळती ।। ३ ।।
वैभव ऐश्वर्याचे तसेच द्रव्याचे ।
देसी दान वरदे सदैव सौख्याचे ।। ४ ।।
यास्तव अगस्ती बंधू आरती ओवाळी।
प्रेमे भक्तासवे लोटांगण घाली ।। ५ ।।
ALSO READ: ॥ श्री महालक्ष्मीची आरती ॥
ALSO READ: श्रीमहालक्ष्मी-व्रताची कथा (गुरुवारची मार्गशीर्ष व्रत कथा)
ALSO READ: Shree Lakshmi Stotram श्री लक्ष्मी स्तोत्र
महत्वाचे संग्रह
वॉलपेपर




Loading...