मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    मल्हारी मार्तंड खंडोबाची जेजुरी

    खंडोबा मंदिर, जेजुरी: महाराष्ट्राचे आराध्य तीर्थक्षेत्र

    पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात वसलेले जेजुरी हे प्रख्यात तीर्थक्षेत्र आहे, जे मल्हारी मार्तंड यांना समर्पित आहे. भगवान शंकरांचे अवतार मानले जाणारे मल्हारी मार्तंड हे अनेक भक्तांचे कुलदैवत आहेत. प्रेमाने आणि श्रद्धेने भक्त त्यांना खंडोबा म्हणून संबोधतात.

    महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून प्रसिद्ध असलेल्या खंडोबाची जेजुरी नगरी सोन्याची जेजुरी म्हणून ओळखली जाते. हळदीच्या उधळणीमुळे जेजुरी परिसर पिवळ्या रंगात न्हालेला दिसतो, ज्यामुळे ती सोन्याची शोभा देते. येथे भाविक लोक हळद-बुक्का उधळत ‘यळकोट यळकोट जय मल्हार’ असा जयघोष करतात.

    लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेले हे पवित्र स्थळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व धार्मिक परंपरेचा अमूल्य भाग आहे.

    ALSO READ: Khandoba Navratri 2024 खंडोबाची आरती

    खंडोबा मंदिर, जेजुरी गड: श्रद्धेचा आणि परंपरेचा मिलाप

    जेजुरी गडावर असलेल्या खंडोबाच्या मंदिरात दर्शनासाठी ३८५ पायऱ्या चढून जावे लागते. या पायऱ्या चढून गेल्यावर भक्तांना अश्वारूढ उभ्या खंडोबाची भव्य मूर्ती दर्शन देते. खंडोबाच्या शेजारीच त्यांच्या पत्नी म्हाळसा देवी यांची देखील प्रतिमा आहे, जी श्रद्धेचा मुख्य केंद्रबिंदू आहे.

    जेजुरी गडाशी संबंधित एक अनोखी परंपरा म्हणजे नववधूला नवरदेवाने कडेवर उचलून पायऱ्या चढणे. असे केल्याने खंडोबाचा आशीर्वाद मिळतो, अशी भक्तांची श्रद्धा आहे. पायऱ्या चढत असताना वाटेत बाणाई मंदिर लागते. बाणाई म्हणजे बानुबाई, या खंडोबाच्या दुसऱ्या पत्नी मानल्या जातात.

    खंडोबाच्या या मंदिराच्या परंपरा आणि भक्तांच्या श्रद्धा यामुळे जेजुरी गड धार्मिक, सांस्कृतिक आणि भावनिक दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण स्थान मानले जाते.

    ​जेजुरीचा खंडोबा नवसाला पावतो म्ह्णून अनेक भक्त नवस करतात आणि इच्छा पूर्ण झाल्यावर मनोभावे नवस फेडण्यासाठी जेजुरीत येतात. व भक्त मोठ्या श्रद्धेने भंडारा उधळत असतात तसेच जेजुरी मध्ये डोंगरावर असलेले खंडोबाचे हे मंदिर अतिशय सुंदर आणि अद्भुत असून काळ्या दगडांमध्ये बांधलेले आहे. तसेच या मंदिराची वास्तुकला हेमाडपंथी असून हे मंदिर 1608 मध्ये बांधण्यात आले आहे. तसेच मंदिरच्या सुरवातीला दगडांची अशी भव्य कामं देखील पाहावयास मिळते. तसेच काही वर्षांपूर्वी धनगर समाजाच्या येथे दीपमाळ आणि पायऱ्या उभारल्या. ज्यामुळे हे मंदिर अतिशय विलक्षण आणि तेजस्वी भासते. 

    खंडोबाचा उत्सव: चंपा षष्ठी

    मार्गशीर्ष महिन्यात येणारा चंपा षष्ठी हा मल्हारी मार्तंड अर्थात खंडोबाचा विशेष उत्सव आहे. या महिन्याच्या पहिल्या दिवशी खंडोबाचे नवरात्र बसते, ज्यामध्ये भक्त आपल्या घरी खंडोबाची स्थापना करून सहा दिवसांची नवरात्र साजरी करतात.

    ही परंपरा खंडोबाच्या भक्तांमध्ये विशेष महत्त्वाची आहे, कारण खंडोबाने मणी आणि मल्ल या दोन राक्षसांचा पराभव करून भक्तांचे रक्षण केले होते. त्या विजयाच्या स्मरणार्थ आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी चंपा षष्ठी साजरी केली जाते.

    चंपा षष्ठीच्या नवरात्रामध्ये मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते षष्ठीपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम होतात. या काळात गावोगावी जागरणे, गोंधळ आणि खंडोबाच्या नावाने भंडारा उधळण्याचे कार्यक्रम होतात. याशिवाय, खंडोबाला वांग्याचे भरीत आणि भाकरीचा नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा आहे.

    खंडोबाच्या नावाला हाक मारल्यावर तो भक्तांच्या मदतीला तत्काळ धावून येतो, अशी श्रद्धा असल्याने खंडोबा भक्तांसाठी आधाराचा देव मानला जातो. त्यामुळे महाराष्ट्रातील सोन्याच्या जेजुरीचे दर्शन घेणे ही भक्तांसाठी अभिमानाची आणि आध्यात्मिक अनुभूतीची गोष्ट ठरते.खंडोबाचे मंदिर जेजुरी कसे जावे?

    विमान मार्ग:
    जेजुरी पुणे शहरापासून सुमारे ४९ किमी अंतरावर आहे. विमानाने प्रवास करण्यासाठी पुण्याचा अंतरराष्ट्रीय विमानतळ जवळ आहे. विमानतळावरून कॅब किंवा टॅक्सीच्या मदतीने सहज जेजुरी मंदिरापर्यंत पोहचता येते.

    रेल्वे मार्ग:
    रेल्वे मार्गाने जेजुरीसाठी पुणे जंक्शनचा वापर करावा लागतो. पुणे जंक्शन अनेक प्रमुख रेल्वे मार्गांशी जोडलेले आहे. त्यानंतर बस किंवा कॅबच्या मदतीने जेजुरी मंदिर गाठता येते.

    रस्ता मार्ग:
    जेजुरीमध्ये रस्ता मार्गाने पोहचणे सोपे आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात असलेल्या जेजुरीला बस सेवा उपलब्ध आहेत. परिवहन मंडळाच्या बस जेजुरीपर्यंत जातात. तसेच पुणे हायवेवरून खासगी वाहन किंवा बसच्या मदतीने जेजुरी मंदिर गाठता येते.

    ​​​

    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा

    वॉलपेपर

    promo banner 1 image
    promo banner 1 image
    promo banner 1 image
    promo banner 1 image
    Loading...