मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.
कपोल झरती मदें शुण्डा बहु साजे
कपोल झरती मदें शुण्डा बहु साजे
कपोल झरती मदें शुण्डा बहु साजे ।
शेंदुर जो घवघवीत अद्भुत सुविराजे ।
घागरियांचा घोळ पदीं घुळघुळ वाजे ।
प्रसन्नवदना देवा ध्याना सुख माजे ॥०१॥
जय देव जय देव गजनरवेषा ।
आरती ओवाळू तुजला विश्वेशा ॥
विशेष महिमा तुझा नकळे गणनाथा ।
हरिसी संकट विघ्ने तापत्रयव्यथा ।
अखण्ड आनंदे तू डोलविसी माथा ।
ताण्डनृत्य करिसी तातक् धिम ताथा ॥०२॥
जय देव जय देव गजनरवेषा ।
आरती ओवाळू तुजला विश्वेशा ॥
विद्या धनसंपदा कनकाच्या राशी ।
नारी सुत मंदिरे सर्वहि तू देशी ।
निर्वाणी पावशी वेगीं भक्तांसी ।
गोसावीनंदन गातो कवितांशी ॥०३॥
जय देव जय देव गजनरवेषा ।
आरती ओवाळू तुजला विश्वेशा ॥
महत्वाचे संग्रह
वॉलपेपर




Loading...