मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.
जय देव जय देव जय वक्रतुंडा
जय देव जय वक्रतुंडा
जय देव जय देव जय वक्रतुंडा ।
सिंदुरमंडित विशाळ सरळ भुजदंडा ॥
प्रसन्नभाळा विमला करिं घेऊनि कमळा ।
उंदिरवाहन दोंदिल नाचासि बहुलीला ।
रूणझुण करिती घागरिया घोळा ।
सतार सुस्वर गायन शोभित अवलीला ॥०१॥
जय देव जय देव जय वक्रतुंडा ।
सिंदुरमंडित विशाळ सरळ भुजदंडा ॥
सारीगमपधनी सप्तस्वरभेदा ।
धिमिकिट धिमिकिट मृदंग वाजति गतिछंदा ॥
तातक् थैय्या करिसी आनंदा ।
ब्रह्मदिक अवलोकिती तव पदारविंदा ॥०२॥
जय देव जय देव जय वक्रतुंडा ।
सिंदुरमंडित विशाळ सरळ भुजदंडा ॥
अभयवरदा सुखदा राजिवदलनयना ।
परशांकुशलड्डूधर शोभित शुभवदना ॥
ऊर्ध्वदोंदिल उंदिर कार्तिकेश्वर रचना ।
मुक्तेश्वर चरणांबुजिं अलिपरि करी भ्रमणा ॥
जय देव जय देव जय ॥०३॥
जय देव जय देव जय वक्रतुंडा ।
सिंदुरमंडित विशाळ सरळ भुजदंडा ॥
महत्वाचे संग्रह
वॉलपेपर




Loading...