मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    . श्रीहरितालिकेची आरती

    जय देवी हरितालिके।

    सखी पार्वती अंबिके।

    आरती ओवाळीतें ।

    ज्ञानदीपकळिके ।। धृ० ।।

    हर अर्धांगीं वससी ।

    जासी यज्ञा माहेरासी।

    तेथें अपमान पावसीयज्ञकुंडीं गुप्त होसी ।। जय० ।। १ ।।

    रिघसी हिमाद्रीच्या पोटीं।

    कन्या होसी तूं गोमटी।

    उग्र तपश्चर्या मोठी ।

    आचरसी उठाउठी ।। जय० ।। २ ।।

    तपपंचाग्निसाधनें।

    धूम्रपानें अधोवदनें ।

    केली बहु उपोषणें ।

    शंभु भ्रताराकारणें ।। जय० ।। ३ ।।

    लीला दाखविसी दृष्टी।

    व्रत करिसी लोकांसाठी ।

    पुन्हां वरिसी धूर्जटी।

    मज रक्षावें संकटीं ।। जय० ।। ४ ।।

    काय वर्ण तव गुण।

    अल्पमति नारायण।

    मातें दाखवीं चरण।

    चुकवावें जन्ममरण।

    जय देव हरितालिके।

    सखी पार्वती अंबिके ।।

    आरती ओवाळितें ।।

    ज्ञानदीपकलिके ।।५।।​

    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा

    वॉलपेपर

    promo banner 1 image
    promo banner 1 image
    promo banner 1 image
    promo banner 1 image
    Loading...