मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.
हनुमंताची आरती
सत्राणें उड्डाणें हुंकार वदनीं ।
करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनीं। कडाडिलें ब्रह्मांड धाके त्रिभुवनीं।
सुरवर नर निशाचर त्यां झाल्या पळणी ।। १ ।।
जय देव जय देव ज श्रीहनुमंता ।।
तुमचेनी प्रसादें न भी कृतांता ।। जय० ।। धृ० ।।
दुमदुमलीं पाताळें उठिला प्रतिशब्द।
थरथरिला धरणीधर मानीला खेद।
कडकडिले पर्वत उड्डगण उच्छेद।
रामीं रामदासा शक्तीचा शोध ।।
जय देव जय देव जय श्रीहनुमंता ।। २ ।।
महत्वाचे संग्रह
वॉलपेपर




Loading...