मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    श्रीगजानन महाराजांची आरती (संध्याकाळची आरती)

    ​जय जय सत्चित्स्वरूपा स्वामी गणराया।

    अवतरलासी भूवर जड-मुढ भूवर जड-मुढ ताराया ।।

    जयदेव जयदेव ।। धृ० ।।

    निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी ।

    स्थिरचर व्यापुन ठरले जे या जगतासी ।।

    ते तू तत्त्व खरोखर निःसंशय अससी ।

    लीलामात्रे धरिले मानवदेहासी ।। १ ।।

    होऊ न देशी त्याची जाणीव तू कवणा।

    करूनि 'गणि गण गणात बोते' या भजना ।।

    धाता नरहरि गुरुवर तूचि सुखसदना ।

    जिकडे पाहावे तिकडे तू दिससी नयना ।। २ ।।

    लीला अनंत केल्या बंकट सदनास ।

    पेटविले त्या अग्नीवाचुनि चिलमेस ।।

    क्षणात आणिले जीवन निर्जल वापीस ।

    केला ब्रह्मगिरीच्या गर्वाचा नाश ।। ३ ।।

    व्याधी वारून केले कैका संपन्न ।

    करवियले भक्तालागी विठ्ठल- दर्शन। भवसिंधु हा तरण्या नौका तव चरण।

    स्वामी दासगणूचे मान्य करा कवन ।। ४ ।।

    कर्पूरदीपं करूणावतारं ।

    संसारसारं भुजगेन्द्रहारं ।।

    सदावसंत हृदयारविंदे ।

    भवं भवानि सहितं नमामि ।।​

    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा

    वॉलपेपर

    promo banner 1 image
    promo banner 1 image
    promo banner 1 image
    promo banner 1 image
    Loading...