मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    एकनाथी भागवत अध्याय ३० ओव्या ४०१ ते ४१३

    ​दारुक धाडिला द्वारकेसी । तंव मैत्रेय आला कृष्णापाशीं ।
    ​तेचि काळीं हृषीकेशी । ब्रह्मज्ञान त्यासी उपदेशी ॥ ४०१ ॥
    ​तो ब्रह्मज्ञानउपदेशविधि । शुक बोलिला तृतीयस्कंधीं ।
    ​म्हणोनि तें निरूपण ये संधीं । न प्रतिपादीं पुनरुक्त ॥ ४०२ ॥
    ​पाहावया कृष्णनिर्याण । उद्धव गुप्त होता आपण ।
    ​तेणें ऐकोनि ज्ञाननिरूपण । संतोषें नमन करी कृष्णा ॥ ४०३ ॥
    ​तेचि काळीं मैत्रेयासी । स्वमुखें बोलिला हृषीकेशी ।
    ​विदुर येईल तुजपाशीं । त्यासी तूं उपदेशीं गुह्यज्ञान ॥ ४०४ ॥
    ​उपदेशूनि मैत्रेयासी । देवें धाडिला तो स्वाश्रमासी ।
    ​उद्धवेंही नमूनि हृषीकेशी । तोही बदरीसी निघाला ॥ ४०५ ॥
    ​दारुक धाडिला द्वारकेसी । मैत्रेय धाडिला स्वाश्रमासी ।
    ​उद्धव धाडिला बदरीसी । व्याधअधमासी धाडिलें स्वर्गां ॥ ४०६ ॥
    ​निजरथसहित घोडे । निजायुधेंसीं धाडिलें पुढें ।
    ​आतां आपणही वाडेंकोडें । निजधामाकडे निघेल ॥ ४०७ ॥
    ​निजधामा निघतां श्रीपती । समस्त देव पाहों येती ।
    ​ते सुरस कथासंगती । पुढिले अध्यायार्थी अतिगोड ॥ ४०८ ॥
    ​अजन्मा तो जन्म मिरवी । विदेहाअंगीं देहपदवी ।
    ​स्वयें अक्षयी तो मरण दावी । अतिलाघवी श्रीकृष्ण ॥ ४०९ ॥
    ​ज्याचें निजधामगमन । शिवविरिंच्यादिकां अतर्क्य खूण ।
    ​त्यांचे सांगेन उपलक्षण । श्रोता अवधान मज द्यावें ॥ ४१० ॥
    ​एकादशाचा कळस जाण । श्रीकृष्णांचे निजनिर्याण ।
    ​जेथ नाहीं देहाभिमान । तें ब्रह्म पूर्ण परिपक्व ॥ ४११ ॥
    ​भय नाहीं जन्म धरितां । भय नाहीं देहीं वर्ततां ।
    ​भय नाहीं देह त्यागितां । ‘हे ब्रह्म-परिपूर्णता’ हरि दावी ॥ ४१२ ॥
    ​एका जनार्दना शरण । पुढें अचुंबित निरूपण ।
    ​संतीं मज द्यावें अवधान । सांगेन व्याख्यान सद्‍गुरुकृपा ॥ ४१३ ॥
    ​इति
    श्रीमद्‍भागवतेमहापुराणे एकादशस्कंधे परमहंससंहितायां
    एकाकारटीकायां ‘स्वकुलनिर्दळणं’ नाम त्रिंशोऽध्यायः ॥ ३० ॥
    श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ५० ॥ ओंव्या ॥ ४१३ ॥​

    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा

    वॉलपेपर

    promo banner 1 image
    promo banner 1 image
    promo banner 1 image
    promo banner 1 image
    Loading...