मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    Durgashtami : मासिक दुर्गाष्टमीला आहे विशेष महत्त्व, मनोकामना पूर्ण करण्यासाठी करा हे विशेष उपाय

    दुर्गाष्टमीच्या दिवशी उपवास केल्यामुळे सर्व इच्छा पूर्ण होतात, असे मानले जाते. या दिवशी दुर्गा मातेच्या व्रताचे पालन आणि पूजेसाठी विशेष महत्त्व आहे. असे सांगितले जाते की उपवास आणि पूजेमुळे व्यक्तीला दुर्गा मातेचा कृपाशीर्वाद मिळतो.

    हिंदू धर्मात दर महिन्याला दुर्गाष्टमीचा (Durgashtami 2024) उपवास ठेवण्याची परंपरा आहे. महिन्यात दोनदा येणाऱ्या अष्टमीपैकी, शुक्ल पक्षातील अष्टमी दुर्गाष्टमी म्हणून साजरी केली जाते. असे मानले जाते की या दिवशी उपवास आणि दुर्गा मातेची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात.

    दुर्गाष्टमीच्या दिवशी व्रत आणि पूजेसाठी विशेष महत्त्व आहे, कारण या दिवशी दुर्गा मातेचा आशीर्वाद लाभतो, संपत्तीमध्ये वाढ होते आणि कोणत्याही कार्यात अडथळा येत नाही. मासिक दुर्गाष्टमीची तिथी काय आहे आणि इच्छापूर्तीसाठी कोणते उपाय करावेत, याची माहिती घेऊया. 

    या मंत्राचा जप करा:
    मासिक दुर्गाष्टमीच्या पूजेसाठी दुर्गा मातेच्या या पवित्र मंत्रांचा जप केल्याने अत्यंत शुभ फळ प्राप्त होतात. त्यामुळे मासिक दुर्गाष्टमीच्या दिवशी या मंत्राचा जप अवश्य करा:

    "या देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्थिता।
    नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:॥"

    विशेष उपाय:
    मासिक दुर्गाष्टमीच्या दिवशी घरातील 8 किंवा 9 लहान मुलींना अन्नदान करा आणि त्यांना काही भेटवस्तू द्या. जर मुलींना घरी आमंत्रित करणे शक्य नसेल, तर त्यांच्या घरी जाऊन भेटवस्तू देऊ शकता.
    असे केल्याने माता दुर्गा प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांवर आशीर्वादाचा वर्षाव करतात, ज्यामुळे जीवनात यश, समृद्धी, आणि शांती प्राप्त होते.

    अष्टमी तिथी महागौरी मंत्र

    या देवी सर्वभू‍तेषु माँ गौरी रूपेण संस्थिता।
    नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:॥
    सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके।
    शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तु ते॥

    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा

    वॉलपेपर

    promo banner 1 image
    promo banner 1 image
    promo banner 1 image
    promo banner 1 image
    Loading...