मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    दुर्गादेवीची आरती

    दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारीं ।।

    अनाथनाथें अंबे करुणा विस्तारीं ।।

    वारीं वारीं जन्ममरणातें वारीं ।।

    हारीं पडलों आता संकट नीवारीं ।। १ ।।

    जय देवी जय देवी महिषासुरमथिनी ।।

    सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ।। जय० ।। धृ० ।।

    त्रिभुवनभुवनीं पहातां तुजऐसी नाहीं।

    चारी श्रमले परंतु न बोलवे कांहीं ।।

    साही विवाद करितां पडले प्रवाहीं ।।

    ते तूं भक्तांलागीं पावसि लवलाही ।। जय० ।। २ ।।

    प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासा ।।

    क्लेशांपासूनी सोडवी तोडीं भवपाशा ।।

    अंबे तुजवाचून कोण पुरविल आशा ।।

    नरहरि तल्लिन झाला पदपंकज लेशा ।। जय० ।। ३ ।।​

    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा

    वॉलपेपर

    promo banner 1 image
    promo banner 1 image
    promo banner 1 image
    promo banner 1 image
    Loading...