मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.
श्रीज्ञानदेवाची आरती
आरती ज्ञानराजा ।।
महाकैवल्यतेजा ।।
सेविती साधुसंत ।।
मनु वेधला माझा ।। आरती० ।। धृ० ।।
लोपलें ज्ञान जगीं ।।
हित नेणती कोणी ।।
अवतार पांडुरंग ।।
नाम ठेविलें ज्ञानी ।। आ० ।।
कनकाचें ताट करीं ।।
उभ्या गोपिका नारी ।।
नारद तुंबरही । साम गायन करी ।। आ० ।। २ ।।
प्रकट गुह्य बोले ।।
विश्व ब्रह्माचि केलें ।।
रामा जनार्दनीं ।।
पायीं मस्तक ठेविले ।। ३ ।।
आरती ज्ञानराजा ।। महाकैवल्य ।।
महत्वाचे संग्रह
वॉलपेपर




Loading...