मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.
धूपारती
जय देव जय देव जय पंढरीराया ।।
धूप अर्पितसे मी भावें तव पायां ।। धृ० ।।
सोज्ज्वळ अग्निरूपा निजतेजोराशी ।।
अहंभाव धूप कृपें जाळीसी ।।
त्याचा आनंद माझे मानसीं ।।
तव दर्शनमोदें सुख हैं सर्वांसीं ।। १ ।।
पूर्णानंद देवा तू सच्चिदानंद ।।
परमात्मा तू अससी आनंदकंदा ।।
पूर्ण करीं तूचीं भक्तांच्या छंदा ।।
अंगीकारूनि धूप दे ब्रह्मानंदा ।। २ ।।
महत्वाचे संग्रह
वॉलपेपर




Loading...