मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    धरित्रीची कहाणी

    ​ऐका परमेश्‍वरा धरित्रीमाये, तुझी कहाणी. आटपाट नगर होतं, नगरांत एक ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणाची स्त्री काय करी ? धरित्रीमायेचं चिंतन करी. वंदन करी. धरित्रीमाये, तूंच थोर, तूंच समर्थ. काकणलेल्या लेकी दे, मुसळकांड्या दासी दे, नारायणासारखे पांच पुत्र दे, दोघी कन्या दे, कुसुंबीच्या फुलासारखं स्थळ दे. हा वसा कधीं घ्यावा ? आखाड्या दशमीस घ्यावा, कर्तिक्या दशमीस संपूर्ण करावा किंवा श्रावणी तृतियेला घ्यावा, माघी तृतियेला संपूर्ण करावा. सहा रेघांचा चंद्र काढावा, सहा रेघांचा सूर्य काढावा, सहा गाईंचीं पावलं काढावीं व त्यांची रोज पूजा करावी. संपूर्णाला काय करावं ? वाढाघरची सून जेवूं सांगावी. कोरा करा, पांढरा दोरा, चोळीपोळीचं वाण द्यावं आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं. ही धरित्रीमायेची साठां उत्तरांची कहाणी पांचां उत्तरीं सुफळ संप्रूण (संपूर्ण).

    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा

    वॉलपेपर

    promo banner 1 image
    promo banner 1 image
    promo banner 1 image
    promo banner 1 image
    Loading...