मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.
दिपारती
जय देव जय देव जय पांडुरंगा ।।
दीपारती ओवाळू तुजला जिवलगा ।। धृ० ।।
स्वयंप्रकाशा तुझी सर्वही दीप्ती ।।
पूर्णानंद प्राप्त करितां तव भक्ती ।।
देहत्रय वाती पाजळोनी प्रीती ।।
ओवाळितों प्रेमें देव तुजप्रती ।। १ ।।
देवा तुज पाहता येतो प्रेमपूर ।।
नाम निरंतर गातां होतो भवपार ।।
वाटे तव भक्ती ही मोठी प्रियकर ।।
विष्णुदासा देई अखंड हा भर ।। २ ।।
महत्वाचे संग्रह
वॉलपेपर




Loading...