मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    श्री दत्त आरती

    दत्ताची आरती (Datta Aarti)

    त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा ।
    ​त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा ।
    नेती नेती शब्द न ये अनुमाना ॥
    सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ॥
    जय देव जय देव जय श्री गुरुद्त्ता ।
    ​आरती ओवाळिता हरली भवचिंता ॥
    सबाह्य अभ्यंतरी तू एक द्त्त ।
    अभाग्यासी कैची कळेल हि मात ॥
    ​पराही परतली तेथे कैचा हेत ।
    ​जन्ममरणाचाही पुरलासे अंत ॥
    दत्त येऊनिया ऊभा ठाकला ।
    भावे साष्टांगेसी प्रणिपात केला ॥
    ​प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिधला ।
    ​जन्ममरणाचा फेरा चुकवीला ॥
    दत्त दत्त ऐसें लागले ध्यान ।
    हरपले मन झाले उन्मन ॥
    ​मी तू पणाची झाली बोळवण ।
    ​एका जनार्दनी श्रीदत्तध्यान ॥​

    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा

    वॉलपेपर

    promo banner 1 image
    promo banner 1 image
    promo banner 1 image
    promo banner 1 image
    Loading...