मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    अंबाबाईची आरती

    सुखसदने शशिवदने अंबे मृगनयने ।।

    गजगमने सुरनमने कोल्हासुरमथने ।।

    सुरवर वर्षति सुमनें करुनीयां नमनें ।।

    भयहरणे सुखकरणे सुंदरि शिवरमणे ।। १ ।।

    जय देवी जय देवी जय वो जय अंबे ।।

    कोल्हापुराधिस्वामिनि तुज वो जगदंबे ।। धृ० ।।

    मृगमद-मिश्रित केशर शोभत तें भाळीं ।।

    कुंचित केश विराजित मुगुटांतुन भाळी ।।

    रत्नजडित सुंदर अंगीं कांचोळी ।।

    चिद्यनाचा गाभा अंबा वेल्हाळी ।। जय० ।।२।।

    कंठी विलसित सगुण मुक्ता सुविशेषं ।।

    पीतांबर सुंदर कसियेला कांसे ।।

    कटितटि कांची किकिणिध्वनि मंजुळ भासे ।।

    पदकमळलावण्यें अंबा शोभतसे ।। जय० ।। ३ ।।

    झळझळ झळझळ झळकति तानवडें कणीं ।।

    तेजा लोपूनि गेले रविशशि निजकिरणीं ।

     ब्रह्मा हरिहर सकळिक नेणति तव करणी ।।

    अद्भुत लिला लिहितां न पुरे ही धरणी ।। जय० ।। ४ ।।

    अष्टहि भुजा सुंदर भासतसे शोभा ।।

    झगझगझग-झगझगीत लावण्यगाभा ।।

    घमघमघमघम घमीत सुमनांची शोभा ।।

    त्र्यंबक मधुर होऊनि वर्णितसे अंबा ।। जय० ।।५ ।।​

    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा

    वॉलपेपर

    promo banner 1 image
    promo banner 1 image
    promo banner 1 image
    promo banner 1 image
    Loading...